कर्मवीर महाविद्यालयात मराठी भाषा गौरवदिन संपन्न

 साहित्याच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे कविवर्य कुसुमाग्रज होते ! -प्राचार्या डॉ.अनिता वाळके.

 कुसुमाग्रज यांचे साहित्य समाजप्रबोधन, राष्ट्रीयता आणि मानवी संवेदनशीलता यांना वाहिलेले आहे.-प्रा.डॉ. विजया गेडाम 



मूल,दीपक देशपांडे 

     आज दि.२७ फेब्रुवारीला शिक्षण प्रसारक मंडळ मूल, द्वारा संचालीत कर्मवीर महाविद्यालय मूल येथे मराठी भाषा गौरव दिना निमित्याने   व्याख्यानाचे  आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ. अनिता वाळके यांच्या मार्गदर्शनात व अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. 

     या कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिन व त्याचे महात्म्य विशद करतांना कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ अनिता वाळके म्हणाल्या की, २७ फेब्रुवारी हा दिवस "मराठी भाषा गौरव दिन" कवीवर्य कुसुमाग्रजांच्या जयंती दिनी सर्वत्र साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्रातील सर्वांगीण सांस्कृतिक व भाषिक वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने समर्पित आहे.  

कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली. म्हणून महाराष्ट्र शासनाने २०१3 मध्ये त्याचां जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन म्हणून  अधिकृतपणे घोषित केला आहे, त्या पुढे म्हणाल्या की, कुसुमाग्रजांनी आपल्या लोकप्रिय व अजरामर साहित्याने मराठी साहित्य  सृष्टीमध्ये नवसौंदर्य निर्माण केले. मराठीतील महान कवी आणि साहित्यिक कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांना 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांना हा सन्मान त्यांच्या "विश्वगाथा" या काव्यसंग्रहासाठी मिळाला, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे.हया उत्कॄष्ठ साहित्याचे आपण अध्ययन व चिंतन केले पाहिजे असे विचार  त्यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले. 

       या प्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अनिता वाळके, प्रमुख अतीथी व मार्गदर्शक प्रा.डॉ. विजया गेडाम ,डाॅ.क-हाडे,प्रा.उपरे, प्रा.घुमडे, डाॅ.माडंवगडे,डाॅ.आगलावे व पर्यवेशक प्रा.बनकर सर उपस्थित होते.

      प्रमुख अतीथी व मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या डाॅ. विजया गेडाम आपले मत व्यक्त करतानां म्हणाल्या  की,कुसुमाग्रजांनी कविता, कथा, नाटक ,कादंबरी आणि लघुनिबंध यांसारख्या विविध साहित्यप्रकारांमध्ये अमूल्य योगदान दिले. त्यांचे साहित्य समाजप्रबोधन, राष्ट्रीयता आणि मानवी संवेदनशीलता यांना वाहिलेले आहे.असा  गुणगौरव त्यांनी आपल्या भाषणातून  मराठी भाषा व निर्मित साहित्याचा केला.

मराठी विभागाचे प्रा.भूषण वैद्य यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले असुन प्रास्ताविक प्रा.उपरे यांनी केले.

    नवीन पिढीत मराठी भाषेची गुणवैशिष्टये आणि प्रेम रूजावे, तंत्रज्ञान आणि आधुनिक सुखसुविधांमध्ये मराठीचा वाढत चाललेला वापर विद्यार्थीनी समजून घ्यावा ,मराठी भाषेच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण करावे या उद्देशाने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन मराठी विभागा तर्फ करण्यात आले होते. 

       या कार्यक्रमाचे आभार  प्रा.समीर आलुरवार यांनी केले,या कार्यक्रमास बहुसंख्येने विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित राहिल्यामुळे उदंड प्रतिसाद लाभला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचार्यांनी मेहनत घेतली.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.