मूल येथील प्रशासकीय भवनात ॲग्रीस्टॉक संदर्भात आढावा सभा संपन्न!

 मूल येथील प्रशासकीय भवनात ॲग्रीस्टॉक संदर्भात आढावा सभा संपन्न!

तहसीलदार मृदूला मोरे यांचे आवाहन.

मूल :—दीपक देशपांडे.

मूल तालुक्यातील  ॲग्रीस्टॉक योजने संदर्भात तालुका प्रशासनाच्या वतीने आढावा सभा घेण्यात आली. या सभेला मार्गदर्शक म्हणून तहसीलदार मृदुला मोरे, नायब तहसीलदार कुंभारे हजर होते.

ॲग्रीस्टाक योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतीला आधार लिंक करायचे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती मिळणार असून सर्व शेतकऱ्यांना आग्रिस्टाक पोर्टल वर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले.

मूल तालुक्यातील एक लाख २५ हजार शेतकरी नोंदणीस पात्र आहेत. परंतु ॲग्री स्टाक वर तालुक्याची नोंदणी संख्या फार अल्प प्रमाणात असल्याने तालुका प्रशासनाच्या वतीने सीएससी केंद्र संचालक  तसेच ग्राम पंचायत संगणक परिचालक,आधार ऑपरेटर यांना माहिती देण्याकरिता  प्रशासनाकडून माननीय तहसीलदार  यांच्याकडून आढावा सभा घेण्यात आली. आढावा सभेत शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टाक वर नोंदणी विहित कालावधीत पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली.

ॲग्रीस्टॅक आढावा सभेला मूल तालुक्यातील सीएससी केंद्र संचालक, ग्रामपंचायत ऑपरेटर उपस्थित होते. अनुपस्थित सीएससी केंद्र चालकांवर कार्यवाही करण्याची सूचना तालुका प्रशासनाकडून वरिष्ठांना देण्यात आली. आढावा सभेला तहसीलदार मृदुला मोरे नायब तहसीलदार कुंभारे तथा तालुक्यातील सीएससी केंद्र संचालक, ग्राम पंचायत संगणक परिचालक उपस्थित होते.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.