जागृत ग्राहक राजा:-अधिवेशन
जागृत ग्राहक राजा:-अधिवेशन, पहिला दिवस.
पुणे:- डीडीन्यूजब्यूरो /दीपक देशपांडे.
*जागृत ग्राहक राजा* या ग्राहक संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुणे येथे २२ व २३ फेब्रुवारी रोजी होऊ घातले असून पहिल्या दिवशी आज २२ फेब्रुवारी शनिवारी सकाळी ११वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
जागृत ग्राहक राजा संघटनेच्या या होणाऱ्या अधिवेशनामध्ये व्यासपीठास *ग्राहक तीर्थ स्व. बिंदू माधव जोशी सभागृह* असे नाव देण्यात येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मान.अनिल जवळकर अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग पुणे हे असणार आहेत आणि जागृत ग्राहक राजा संघटनेचे राज्य अध्यक्ष मान. दिलीप फडके हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मान.रामेश्वर जटाले , अध्यक्ष पोलिस तक्रार प्राधिकरण पुणे ,मान.सचिन निवंगुणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रिटेल व्यापारी संघटना,मान.किशोर लुल्ला, सांगली, मान.सुभाष खुटवड, उपसंपादक दै.सकाळ पुणे,मान.मिलिंद लडगे,एम.डी.आर्यन वर्ल्ड स्कूल पुणे,मान.विजय मिश्रा सिने कलाकार ठाणे, मान.ॲड.प्रार्थना सदावर्ते, सल्लागार, जागृत ग्राहक राजा संघटना आदी मान्यवर,व अन्य अतिथी गण उपस्थित असणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे:-
जागृत ग्राहक राजा संस्था, @
महाराष्ट्र राज्य
राज्य स्तरीय अधिवेशन २०२५
स्थळ - आर्यन वर्ल्ड स्कूल,
भिलारे वाडी,जुना कात्रज
घाट,पुणे.
• प्रथम दिवस : कार्यक्रम
रविवार, दि.२२ फेब्रु.२०२५
उद्घाटन समारंभ - स.११ वा.
------------------------------------
* स्वागत व प्रास्ताविक -
प्रा.नागनाथ स्वामी,
राज्य सचिव.
* सत्कार -
संघटना पदाधिकारी यांचे
हस्ते - शाल,श्रीफळ व
मोमेंटो देऊन.
* अधिवेशन उद्घाटन -
हस्ते - मा.अनिल जवळकर,अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक आयोग,पुणे व
मान्यवर प्रमुख पाहुणे.
* पुस्तक प्रकाशन ,पुस्तकाचे नाव, लेखकाचे मनोगत -
१." आपला ७/१२ "
लेखक - माधवराव गावडे.
२."फसू नका " ( fraud)
लेखिका - सौ.नयन चव्हाण
* प्रमुख पाहुण्यांची मनोगते -
मा. रामेश्वर जटाले,अध्यक्ष,
पोलिस तक्रार प्राधिकरण,
पुणे.
मा.सचिन निवंगुने,
अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य रिटेल
व्यापारी संघटना.
मा.अनिल जवळकर,अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक आयोग,पुणे.
विषय - ग्राहक न्यायालय
कार्यपद्धती
* मा.सुभाष खुटावड,उपसंपादक,
* दैनिक सकाळ,पुणे .
* मा.मिलिंद लडगे, एम डी
* आर्यन वर्ल्ड स्कूल.
* प्रा.दिलीप फडके,
* मा.किशोर लुल्ला.
*
* अध्यक्षीय भाषण -
मा.दिलीप फडके,
राज्य अध्यक्ष
समारोप -
---------------------------------------------
भोजन सुट्टी - दु.२ ते ३
---------------------------------------------
दुपार सत्र - ३ वा.
---------------------
मार्गदर्शन -
मा. जटाले साहेब.
विषय - पोलिस तक्रार प्राधिकरण
कार्यपद्धती.
--------------
मा.धनंजय मुळे.
विषय - वजन, मापे, काटे वैधता
व फसवणूक. ३५ मि.
मोठी सुट्टी -
--------------
तिसरे सत्र - सायं.७ वा
मा.विकास कुचेकर,अध्यक्ष,
ह्युमन राईट्स संघटना,
विषय - मानवाधिकार म्हणजे काय?
व मानवाधिकार आयोगात तक्रार
कधी दखल करावी ?
मा.शामकांत पात्रीकर,
ज्येष्ठ पत्रकार,नागपूर
विषय - पत्रलेखन कसे करावे. ३५ मि.
रात्रीचे जेवण :-८ ते ९
मनोरंजन:-९ ते १०:३०
मग,चलताय ना, अधिवेशनाला?
पुण्य नगरीत, जागृत ग्राहक राजा चे स्वप्न साकारायला?
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment