जागृत ग्राहक राजा पहिले अधिवेशन पुणे समारोप समारंभ आणि ग्राहक योद्धा पुरस्कार वितरण..

 जागृत ग्राहक राजा या सामाजिक संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजला तो ग्राहक योद्धा पुरस्कारांमुळे.

पुणे,दीपक देशपांडे 



जागृत ग्राहक राजा या ग्राहक संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुणे येथील आर्यन वर्ल्ड स्कूल, भिलारे वाडी येथील ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी सभागृहात आयोजित करण्यात आले होते,या अधिवेशनाचा दुसरा दिवस उजाडला तोच एक आनंद घेऊन,एका सुंदर नयनरम्य परिसरात, सभोवताली डोंगरमाथा आणि त्या डोंगरमाथ्यावरुन झेपावणारी सुर्य किरणे एक आगळावेगळा आनंद आणि उत्साह यांची उधळण करीत होता,पक्षांचा किलबिलाट , आणि नानाविध फुलांचा सुगंध परिसरात दरवळत होता तर गुलाबी थंडी पर्यटन क्षेत्रात आल्याचा भास निर्माण करीत होती.

सकाळचा चहा नाश्ता आटोपून कार्यकर्ते  तयारी करुन सभास्थानी पोहोचले तेव्हा थोडा सूर्य वर आला आणि पहिल्या सत्राची लगबग सुरू झाली ,आज सत्राची सुरुवात ही अधिवेशनाच्या समापनाची आणि पुन्हा आपल्या गंतव्याची आठवण करून देत होती.

पहिल्या सत्रात मान.अजय भोसरेकर माजी अध्यक्ष वीज तक्रार निवारण आयोग यांनी वीज विषयक तक्रारी,त्यावर उपाययोजना, आणि दंडात्मक तरतुदी समजावून सांगताना ग्राहक आपल्या अधिकारांप्रती अनभिज्ञ असल्यामुळे त्यांची फसवणूक होत असल्याचे व नवीन वीज धोरण ग्राहकांची लूट करण्यासाठी सुरू असलेला एक प्रयत्न असल्याने ग्राहक जागृतीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

दुसऱ्या सत्रात अजित वाराणसीवार यांनी भाषण व संभाषण कौशल्य सहजसुलभ शब्दात पटवून देताना भाषण कला कशी वृद्धिंगत करायची हे सोदाहरण स्पष्ट केले.

तिसऱ्या सत्रात मान.विकास कुचेकर , मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष यांनी, मानवाधिकार आयोगाकडे तक्रार कशी दाखल करावी पासून त्यात येणारे अडथळे आणि अंतिम विजय कसा करुन घ्यायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले,मात्र शासन नवनवीन कायदे तयार करते,त्याचा उद्देश चांगला असतो परंतू त्याची अंमलबजावणी होत नाही याबाबत खेदही व्यक्त केला,जाता जाता मानवी अधिकार आणि ग्राहक संरक्षण अधिकार हे वेगवेगळे नाहीत त्यामुळे आपण हा लढा एकत्रित देण्यासाठी व समाजातील फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता बोलून दाखवली.

ग्राहक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे चर्चासत्रात विविध विषयांवर चर्चा झाली आणि काही ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता प्रतिपादीत केल्या गेली.तसे काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

विशेष म्हणजे या संपूर्ण अधिवेशनात सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत हे संघटनेच्या वतीने प्रकाशित पुस्तके, माहितीचा खजिना लेखक,दिलीप फडके, अध्यक्ष जागृत ग्राहक राजा संघटना पुणे ,  कार्यकर्ता,लेखक नागनाथ स्वामी,आपला ७/१२लेखक माधवराव गावडे,फसू नका लेखिका,नयन चव्हाण, ह्या संघटनेचे  पदाधिकारी यांनी लिहिलेल्या व प्रकाशित केलेली पुस्तके देऊन करण्यात आला.

समारोप समारंभ, जागृत ग्राहक राजा संघटनेचे संघटक, दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उद्योगपती अशोक चोरघे, मिलिंद लडगे,एम.डी.आर्यन वर्ल्ड स्कूल, वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा, प्राचार्य मोहन राजमाने , श्रीमती पूजा संदीप पाटील सहायक जिल्हा  नियोजन अधिकारी सांगली , प्राचार्य प्रतिक लडगे, आर्यन वर्ल्ड स्कूल पुणे,श्री आप्पासाहेब पाटील,स्विय सहाय्यक ,दिलीप फडके, अध्यक्ष जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना महाराष्ट्र आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी, प्रमुख अतिथी उद्योजक, अशोक चोरघे यांनी आम्हीही ग्राहक प्रतिनिधीच आहोत आणि ग्राहक हित जपण्यासाठी आम्ही जागृत ग्राहक राजा संघटनेच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देत आम्हालाही तुमच्यात सामावून घेण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.

सत्कार समारंभ आटोपल्यावर उत्तर देताना सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी बिंदुमाधव जोशी यांचे ग्राहक चळवळीतील योगदान जवळून बघितल्याचे व जागृत ग्राहक राजा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे समर्पण जवळून अनुभवता आल्याचे स्पष्ट करीत संघटनेच्या विस्ताराची प्रशंसा केली व सुंदर आयोजनासाठी कौतुक केले व राज्यभरातील  पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आर्यन वर्ल्ड स्कूल चे संस्थापक,एमडी.मिलिंद लडगे यांनी  कुठल्याही व्यवहारात नफा असावा मात्र नफेखोरी नसावी ,असा विचार मांडताना, कुठल्याही नफ्याचा विचार न करता कार्य करणारी ही मंडळी म्हणजे, जणू कार्यकर्त्यांच्या  रुपातील विठ्ठलच असल्याचा भास होत असल्याचे स्पष्ट करीत मी स्वतः तुमच्या सोबत संघटना वाढीसाठी काम करणार असून कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार असल्याची ग्वाही दिली. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप पाटील संघटक जागृत ग्राहक राजा यांनी अध्यक्षीय समारोप करताना , संघटना,संघटनेचे कार्य, कार्य विस्तार आणि येणाऱ्या अडचणी, अडचणींवर मात करण्याची क्षमता व तयारी याबाबत सखोल माहिती दिली,व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या,व दूरवरून आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या कार्याचा आढावा घेतला.

समारोप करताना शासकीय अधिकारी यांना ग्राहकहित जपणारे उत्कृष्ट  शासकीय अधिकारी, म्हणून, वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा,पूजा  संदीप पाटील, सहाय्यक नियोजन अधिकारी सांगली व आप्पासाहेब पाटील स्विय सहाय्यक यांना स्व.बिंदुमाधव जोशी,   ग्राहक योद्धा पुरस्काराने, तर राज्यभरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ५, निवडक ग्राहक प्रतिनिधींना   ग्राहक योद्धा   पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते, यांत स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुस्तकांचा संच भेट देऊन गौरविण्यात आले,यांत



 १. 










१.दीपक देशपांडे मूल,   यांच्यासह,

२.शिवाजी काळे, ता.जुन्नर

 ३.सौ दुर्गाताई शुक्रे,पुणे

 ४.सौ श्रद्धा शिंदे, इस्लामपूर

तसेच 

राज्य कार्यकरिणी विशेष सन्मान -

५.सौ शैला शिळीमकर, पुणे 

 या पाच प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांचा ग्राहक  योद्धा  म्हणून सन्मान करण्यात आला .

तसेच महाराष्ट्रातील इतरही विभागातील हंबीरराव देशमुख (शिराळा,), गजानन गिरी ( कराड),चंद्रहार ऊर्फ बकाजीराव निकम (पाटण), विनोद लोहार यांनाही त्यांच्या  विभागातील उत्तम कामगिरी बाबत ग्राहक योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी संघटनेमार्फत आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र,पुस्तकांचा संच व पारितोषिक आणि सहभागी शाळेपैकी उत्कृष्ट निकाल देणाऱ्या शाळांनाही स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र सादर व पुस्तकांचा संच, भेट देऊन गौरविण्यात आले.

यानिमित्ताने पडद्याआड कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांचाही उचित सन्मान करण्यात आला. 

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जंगम सर  यांनी केले,तर समृद्धी  व स्वरांगी  या दोन  बहिणींनी उत्कृष्ट असे स्वागत गीत सादर केले. तर आभार प्रदर्शन पहिल्या दिवशी संघटनेचे सचिव प्रा नागनाथ स्वामी आणि समारोप करताना संघटनेचे अध्यक्ष दिलीप फडके यांनी केले,   कार्यक्रमाला जागृत ग्राहक राजा या संघटनेचे कार्यकर्ते,  पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते, याशिवाय वेगवेगळ्या  शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांचे पालक व नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.