मोठ्या थाटामाटात पार पडले, जागृत ग्राहक राजा चे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन!
मोठ्या थाटामाटात पार पडले जागृत ग्राहक राजा चे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन!
पहिला दिवस
पुणे ,दीपक देशपांडे
विद्या नगरी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील जागतिक दर्जाच्या आर्यन वर्ल्ड स्कूलच्या भिलारे वाडी येथील भव्य दिव्य सभागृहात जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या सभागृहाला ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी सभागृह असे नामकरण करुन हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या अधिवेशनात पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा, पुस्तक प्रकाशन, विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन, मनोरंजन, चर्चासत्र यांसारख्या कार्यक्रमाचा समावेश होता.
जागृत ग्राहक राजा, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या अधिवेशनात उद्घाटन सोहळ्यात, पुणे ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळकर, पोलिस तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष रामेश्वर जटाले, सचिन निवंगुणे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रिटेल व्यापारी संघटना, सुभाष खुटवड उपसंपादक दैनिक सकाळ,पुणे,अजय भोसरेकर माजी अध्यक्ष वीज तक्रार निवारण आयोग पुणे व नाशिक व संघटनेचे इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळकर म्हणतात , माझ्यापुढे हा प्रश्न होता की सगळेच अभ्यासू या कार्यक्रमात सहभागी असणार आहेत आणि आपण त्यांना काय मार्गदर्शन करावे त्यामुळे या कार्यक्रमात जावे की नाही हा मोठा प्रश्न होता,कारण कार्यकर्त्यांना समजून घेणे फार कठीण आहे, आणि आज ग्राहक हा राजा आहे का? असा मोठा संभ्रम आहे,पण प्रत्येकाला आपण तक्रार दाखल केली की त्याचा निकाल लवकर लागावा अशी अपेक्षा असते,मात्र कोणतीही तक्रार दाखल करताना तक्रार ही सुटसुटीत व मोजक्या शब्दात मागणी असावी व आवश्यक ते कागदपत्रांचा संच सोबत जोडलेले असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट करताना त्यात एकजरी त्रुटी आढळल्यास ती केस दोन वर्षे मागे जाऊ शकते हेही यानिमित्ताने समजावून सांगितले , तसेच केसचा निकाल लवकर लागावा यासाठी ग्राहक न्यायालयांची संख्या वाढणे आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुर्ण असणेही गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले,व ही मागणी जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या वतीने उचलून ती पुर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
पोलिस प्राधिकरण अध्यक्ष रामेश्वर जटाले यांनी पोलिस प्राधिकरण स्थापनेचा उद्देश व व्याप्ती आणि अधिकार याबाबत प्रबोधन केले,व मी या पदावर यासाठी बसलो आहे की जे खरे अडलेनडले आहेत त्यांचे अश्रु पुसण्याची जबाबदारी माझी आहे,हे काम करताना ह्याची जाणीव झाली आणि मग मी त्यासाठी काम करु लागलो असे स्पष्ट केले.
सचिन निवंगुणे हे उद्योजक म्हणतात,की आम्ही इथे व्यापारी संघटना अध्यक्ष म्हणून उपस्थित असलो तरी आधी ग्राहकच आहोत , आणि ग्राहक हा जागरुक नाही हे मान्य करावेच लागेल, त्यासाठी आपले कार्य हे फार महत्त्वाचे असून आपल्या माध्यमातून समाजजागृती चे फार मोलाचे कार्य पार पाडले जात असल्याने ग्राहकांना आपल्या अधिकारांची जाणीव होत असल्याचे व आपली कार्यपद्धती अतिशय स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले व आम्ही ग्राहक जागृती साठी सहकार्य करण्यासाठी नेहमी सहकार्य करु असे अभिवचन दिले.
सुभाष खुटवड उपसंपादक दैनिक सकाळ यांनी या संघटनेचे कार्य मी जवळून बघत असून या संघटनेसाठी कार्य करताना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची तळमळ बघून एक पत्रकार म्हणून आढावा घेणे सोपे आहे मात्र आपल्यासमोर या विषयावर भाषण देणे अतिशय कठीण आहे असे स्पष्ट करीत कार्याला शुभेच्छा दिल्या.
दिलीप फडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, आम्ही माणसं तयार करतो असे स्पष्ट करीत आजवरच्या कार्याचा आढावा घेतला आणि भविष्यात करावयाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून कार्यारंभ करण्याचा संकल्प विशद केला.संघटना आहे म्हणून मी आहे , या संघटन सुत्राचा सगळ्या कार्यकर्त्यांनी अवलंब करण्याची गरज प्रतिपादन केली.
तर
विविध मार्गदर्शन सत्रात ,
रामेश्वर जटाले अध्यक्ष पोलिस प्राधिकरण यांनी पहिले पुष्प गुंफले, आणि पोलिस प्राधिकरण स्थापना व कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले.
नागनाथ स्वामी, सचिव जागृत ग्राहक राजा, यांनी शासकीय पत्रव्यवहार कसा असावा? याबाबत सविस्तर माहिती सादर केली.
परिसर भ्रमंतीत आर्यन वर्ल्ड स्कूल च्या परिसरात सगळ्या अधिवेशनात सहभागी कार्यकर्त्यांनी मनसोक्त आनंद लुटला, सायंकाळी मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपल्यातील कलागुणांना सादर करीत इतरांनाही प्रेरणा दिली.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment