राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन!
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागृती कार्यक्रमाचे सावली व सिंदेवाही येथे आयोजन!ग्राहक राजा जागा हो!
दीपक देशपांडे
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली आणि सिंदेवाही येथे महसूल प्रशासन आणि ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त वेगवेगळ्या दोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिला कार्यक्रम दिनांक २७/१२/२०२४ रोज शुक्रवारी सावली येथे दूपारी १२वाजता आणि दुसरा कार्यक्रम शुक्रवार दिनांक २७/१२/२०२४रोजी सिंदेवाही येथे दूपारी ३ वाजता असे दोन्ही कार्यक्रम तहसील कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आले आहेत.
या दोन्ही कार्यक्रमांना ग्राहक पंचायत(म) चे पदाधिकारी उपस्थित राहून ग्राहक संरक्षण अधिनियम व ग्राहक हक्क याबाबत मार्गदर्शन करणार आहेत,या संधीचा फायदा या दोन्ही तालुक्यातील जनतेने घ्यावा असे आवाहन ग्राहक पंचायत चे वतीने रमेश डांगरे सचिव ग्राहक पंचायत मूल यांनी आणि सावली व सिंदेवाही तालुक्यातील तहसीलदार यांचे वतीने तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेले आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment