कर्मवीर महाविद्यालय मूल च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचा समारोप समारोह मौजा चितेगांव येथे संपन्न “

 कर्मवीर महाविद्यालय मूल च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचा समारोप समारोह मौजा चितेगांव येथे संपन्न 

दीपक देशपांडे मूल 

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित व शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूल अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष वार्षिक शिबिर दिनांक १८/१२/२०२४  ते २४/१२/२०२४ पर्यंत मौजा चितेगांव येथे “Youth for my Bharat and Youth for digital literacy ” या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

शिबिराचा समारोप सोहळा दिनांक २४/१२/२०२४ ला सौ. शुभांगीताई वैरागडे माजी मुख्याध्यापक नवभारत कन्या विद्यालय मूल यांच्या अध्यक्षतेखाली  व कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्य व रासेयो विभागाच्या संयोजक  डॉ.अनिता वाळके, सौ.कोमल रंदये सरपंच चितेगांव, श्री. बट्टे सर मुख्याध्यापक ऊ.प्रा.शाळा,चितेगांव, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप मांडवगडे, डॉ. केवळ कऱ्हाडे व प्रा. कमलेश नागोसे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. 

सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयोजक व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके  यांनी केले. यामध्ये त्यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगापासून तर दैनंदिन कार्यक्रमांवर प्रकाश टाकला . यामध्ये त्यांनी आजच्या युवकांना देश प्रेम व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राम व शहर एकमेकांचे पुरक कसे होतील यावर आपले लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ. कोमल रंदये सरपंच चितेगांव यांनी विद्यार्थ्यांनी गावात केलेल्या सर्व कामाचा आढावा घेऊन ग्राम विकासात रासेयो स्वयंसेवकांनी दिलेल्या सहभागाबद्दल कौतुक केले. त्यानंतर समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. शुभांगीताई वैरागडे यांनी नवयुवकांनी आपल्या ध्येयाबाबत जागरुक राहुन देशाच्या विकासात आपला सहभाग दर्शवावा व ग्रामोन्नती सोबतच देशोन्नती घडविण्यात आपले जीवन समर्पित करावे. अशा उद्गारांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

 तदनंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व घटित सात दिवसांचा अहवाल रासेयो चे कार्यक्रमाधिकारी डॉ.संदीप मांडवगडे यांनी संपूर्ण सात दिवसांचा कार्यक्रम सभेपुढे ठेवतांना दिनांक १८/१२/२०२४ ला शिबिरस्थळी आगमनापासून तर २४/१२/२०२४ ला समारोपीय कार्यक्रमापर्यंतचे  अवलोकन केले.

 त्यामधे दैनंदिन कार्यक्रम सकाळी ६ वा. जागर व प्रार्थना पासून प्रारंभ  करुन दुपारी ४ ते ५ वा. विविध विषयांवरिल बौद्धिक सत्रामध्ये दि.२०/१२/२४ ला डॉ.महेश जोशी केवळराम हरडे महा.चामोर्शी यांनी व्यायामाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर अत्यंत रंजक भाषण केले. 

याच शृंखलेमध्ये दि.२१/१२/२४ ला सर्पज्ञान व त्याविषयीची अंधश्रद्धा या विषयावर सर्पमित्र श्री. उमेशसिंह झिरे अध्यक्ष संजीवन पर्यावरण संस्था मूल यांनी अनेक उदाहरणांनी व स्व अनुभवांतून घटित घटनांद्वारे स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

 दि.२२/१२/२४ ला निवृत्त शिक्षक मान.श्री. बिऱ्हेवार यांनी स्वयंसेवकांनी ग्रामगीतेचे पठण करून आपल्या जीवनात योग्य बदल घडवून आणावा व देशोन्नतीसाठी कार्यरत राहावे असा संदेश दिला.

दि.२३/१२/२४ ला दुपारी ३ ते ४ वा.च्या सत्रात ग्राहक पंचायत मूल शाखेतर्फे स्वयंसेवकांना ग्राहक ,ग्राहकांचे  अधिकार व त्याचे संरक्षण यावर विविध कायद्यांबाबत अवगत केले,व फसवणूक टाळण्यासाठी आपण आपल्या अधिकारांची माहिती करुन घेणे किती आवश्यक आहे याबाबत ग्राहक पंचायत मूलचे अध्यक्ष  श्री.दीपक देशपांडे, यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, सोबतच रमेश डांगरे सचिव, अशोक मैदमवार उपाध्यक्ष व सभासदांनी विविध उदाहरणांनी कायद्याचे ज्ञान देत मार्गदर्शन केले. 

यानंतर दु. ४ ते ५ वा. ताडाळाचे उपसरपंच श्री. अखिलेश चामरे यांनी स्वतःच्या अनुभवांतील राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रवास व त्यातून घडलेले व्यक्तिमत्त्व स्वयंसेवकांसमोर अत्यंत सुंदर वणीतून रेखाटले व आजच्या युवकांनी देखील समाजामध्ये राहून देशहित साधावे असा संदेश देत आपल्या वक्तृत्व शैलीने स्वयंसेवकांना उपकृत केले. 

सोबतच संपूर्ण गावामधे दररोज प्रभात फेरी काढून त्यामधे युवकांमध्ये बळावलेल्या व्यसनाधीनतेवर आधारित व रस्ता सुरक्षा यावर आधारित पथनाट्य व भजनांद्वारे जन जागरण केले. सोबतच परिसर स्वच्छ करून शाळा व गावातील मुख्य ठिकाणी ग्रामस्थांच्या सहभागाने स्वछता अभियान राबविण्यात आले. प्राथमिक शाळेत शोष खड्डे व वृक्षारोपण करण्याकरिता खड्डे खणण्यात आले. दुपारच्या बौद्धिक सत्रांमध्ये वेगवेळ्या विषयांवर विविध मार्गदर्शकांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सायंकाळच्या सत्रामध्ये दररोज स्वयंसेवकांच्या सांस्कृतिक कलागुनांना वाव मिळवा याकरिता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामधे एकल नृत्य, समुह नृत्य, सामाजिक उद्बोधनप्रद एकांकिका व पथनाट्य स्वयंसेवकांनी हिरिरीने सादर केले यास ग्रामस्थांचा बहुसंखेने उपस्थिती दर्शवून उत्तम प्रतिसाद मिळाला. 

या सात दिवसीय निवासी शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सौ. शुभांगीताई वैरागडे व  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी स्वयंसेवकांनी रासेयो चे ब्रीद “Not me, but you” सदैव ध्यानात ठेवावे व समाज सेवेचे व्रत अंगीकृत करावे असा संदेश देत शिबिराच्या आयोजनाविषयी उत्तम शेरा देत सर्व आयोजकांचे व शिबिरार्थींचे अभिनंदन केले. 

या कार्यक्रमाचे संचालन योगेश सीडाम यांनी केले व आभारप्रदर्शन संघर्ष गजाभिये यांनी केले.या शिबिराच्या आयोजनाकरिता कार्यक्रम अधिकारी डॉ.संदीप मांडवगडे, डॉ. केवळ कऱ्हाडे, प्रा.कमलेश नागोसे, चितेगांव  येथील ग्रामस्थ व  सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय सेवा योजना गीत गाऊन करण्यात आली.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.