नगरप्रशासनाने शोधले त्या दुर्गंधीचे कारण....कार्यवाही व्हावी ही जनतेची मागणी.

 नगर प्रशासनाने शोधले त्या दुर्गंधीचे कारण.... कार्यवाहीची जनतेची मागणी.


दीपक देशपांडे मूल 

मागील तीन दिवसांपासून मूल बसस्थानक परिसरात शिरकाव करताच एक उग्र दर्प प्रवाशांना प्रवेश करण्यापासून रोखत होता, याबाबत प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता ग्राहक पंचायत मूल शाखेकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत ग्राहक पंचायत पदाधिकारी यांनी या प्रकाराबाबत मूल तालुका  प्रशासन व  मुख्याधिकारी यांना ही बाब कळविली व यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

नगरप्रशासनाने याबाबत कार्यवाही करताना प्रथमदर्शनी बसस्थानकावर असलेली सांडपाण्याची पाइपलाइन चोक झाल्याने ही दुर्गंधी पसरली असावी असा कयास बांधत ती पाइपलाइन स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला ,परत दुसऱ्या दिवशी दुर्गंधी पसरु लागल्याने अधिक चौकशी करता काही प्रमाणात तलावातील मासे मृत्यूमुखी पडत असल्याचे आढळून आले परिणामी काही किटकनाशके वापरली गेली आहेत की काय याचाही शोध घेतला गेला आणि सरतेशेवटी बसस्थानकावर असलेल्या कॅंटिन चालकांच्या भाजीपाला, उर्वरित अन्न तलावात  फेकल्या मुळे  व भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरलेले वाशिंग पावडर व तेल यांच्यामुळे पाण्यातील शेवाळादी वनस्पती मृत झाल्याचे व त्यामुळे ही दुर्गंधी पसरत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

नगरप्रशासनाने अग्निशमन दलाच्या गाडीचे मदतीने अतिदबावाने पाणी सोडून पाइपलाइन स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र यातून निघालेल्या तेलादी वस्तुंमुळे हा सगळा प्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असल्याचे मत मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी आमच्याशी वार्तालाप करताना स्पष्ट केले आहे.

एकीकडे ग्राहक पंचायत मूल शाखा व नगरप्रशासनाच्या कार्यवाहीची जनता प्रशंसा करीत असतांनाच कॅंटिन चालकांच्या जनतेच्या  जिवाशी खेळ करु बघणाऱ्या व मनमानी कारभारावर तातडीने अंकुश लावणे आवश्यक असल्याचे बोलून दाखवत असून त्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी ग्राहक पंचायत मूल तालुका शाखा मूलकडे केली आहे.

या सर्व बाबी विचारात घेता नगरप्रशासनाने  व चंद्रपूर  जिल्हा परिवहन प्रशासनाने कॅंटिन चालकांना यानंतर असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी एका ठराविक रकमेचा दंड ठोठावत  मानवतेच्या दृष्टिकोनातून एक संधी देण्यात यावी अशी मागणी ग्राहक पंचायत मूल तालुका शाखा मूलच्या वतीने करण्यात आली आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.