ग्राहक म्हणून आपल्या हक्कांप्रती जागरुक होत नाही तोपर्यंत फसवणूक होतच राहणार:-दीपक देशपांडे.
ग्राहक म्हणून आपल्या हक्कांप्रती जागरुक होत नाही तोपर्यंत फसवणूक होतच राहणार:-दीपक देशपांडे.
मूल तालुक्यातील राजगड येथे ग्राहक जागृती सप्ताहाची सांगता.
मूल ,डीडिन्यूजब्यूरो.
ग्राहक हा राजा असला तरी तो आज नावापुरताच राजा असून पावलोपावली त्यांचे शोषण होत आहे कारण एकतर तो संघटीत नाही आणि त्याला आपल्या अधिकारांची जाणीव नाही, त्यामुळे जे पुढे दिसते ते सत्य मानून तो आपल्या गरजा भागवतांना आपली फसवणूक होत आहे याची त्याला कल्पना नसते आणि फसवणूक झाल्यानंतर नेमकं काय करायचं ह्याचा तो शोध घेतांना त्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने तो खचून जातो व मोठे आर्थिक नुकसान करुन बसतो , त्यामुळे ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेल्या हक्कासाठी जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही अशा कार्यक्रमांचे आयोजन करुन ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत, यासाठी शासनाने कायदे केले आहे फक्त त्याची माहिती आपल्याला नाही आणि म्हणूनच आपली फसगत होते आहे असे स्पष्ट करीत छोट्या छोट्या उदाहरणातून पटवून देण्याचा प्रयत्न दीपक देशपांडे, अध्यक्ष ग्राहक पंचायत मूल यांनी आपल्या प्रबोधनातून केला.
मूलच्या तहसीलदार मृदूला मोरे यांनी आमची मागणी ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम तहसील कार्यालयाचे बंदिस्त सभागृहात घेण्याऐवजी एखाद्या गावात जनतेच्या दरबारात घेण्याची सुचना मान्य करुन तहसील कार्यालयाचे सभागृहात आणि राजगड येथे जनतेच्या दरबारात घेण्याचे सुचविले आणि त्याची पूर्तता केली त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने जनतेला त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देऊन शकलो आणि हे कार्यक्रम असेच जनतेच्या दरबारात घेतले जावेत जेणेकरून या निमित्ताने ग्राहकांचे प्रबोधन होण्यास मदतच होते असे ही दीपक देशपांडे यांनी आपल्या प्रबोधनातून स्पष्ट केले व मूल तहसील प्रशासनाने केलेली ही पहल अभिनंदनीय असल्याचे स्पष्ट केले.
आजपर्यंत असा कार्यक्रम आम्ही अनुभवला नव्हता आणि आमच्या हक्कांप्रती जागरुक नव्हतो परंतू आजच्या या कार्यक्रमामुळे ग्राहक हा राजा असून त्याची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आमच्या गावाच्या लोकांना चांगली माहिती यानिमित्ताने मिळाली असे मत आदर्श राजगड गावचे सरपंच रविंद्र चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले व या कायद्याची अधीक माहिती मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी कबुली दिली.
२४ डिसेंबर २०२४ रोजी ग्राहक पंचायत मूलच्या वतीने राबविण्यात आलेल्या ग्राहक जागृती सप्ताहाची सांगता तालुक्यातील राजगड येथे आयोजित एका कार्यक्रमातून करण्यात आली,या कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालय मूल आणि ग्राहक पंचायत मूल यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
राजगड ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रविंद्र चौधरी सरपंच ग्रामपंचायत राजगड तर प्रमुख अतिथी म्हणून ग्राहक पंचायत मूल चे अध्यक्ष दीपक देशपांडे, सचिव रमेश डांगरे, तालुका संघटक, तुळशीराम बांगरे, डॉ आनंदराव कुळे, राजेश शिरभाते पुरवठा निरिक्षक तहसील कार्यालय मूल,तलाठी,मंडल अधिकारी, पोलिस पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रमेश डांगरे यांनी ग्राहकांचे शोषण कशा पद्धतीने सुरू आहे त्यासाठी कोणत्या प्रकारांचा अवलंब केला जातो याबाबत माहिती दिली,तर डॉ आनंदराव कुळे यांनी फसवणुकीपासून सावध राहण्याची आवश्यकता व्यक्त करीत ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहक जागृती कार्य सुरू असल्याचे मत व्यक्त केले.
गावातील तरुणींनी अतिशय सुंदर ग्राहक गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात केली तर पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले., कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गावातील धान्य दुकानदार यांनी केले.
कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, याप्रसंगी त्यांनी आपल्या समस्या उपस्थितांसमोर मांडल्या ज्यामध्ये मागील काही दिवसांपासून ईपाज मशीनवर ठसा लागत नसल्यामुळे अन्नधान्य मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्यासाठी कागदपत्रे घेऊन तहसील पर्यंत पायपीट करावी लागत असल्याची प्रमुख तक्रार पुढे आली आणि त्यासाठी कागदपत्रे राशन दुकानात जमा करण्याची परवानगी दिली जावी व त्यांनी तहसील कार्यालयात ते जमा करून आम्हाला धान्य वितरण सुरळीत सुरू करावे ही प्रमुख मागणी होती.
पुरवठा अधिकारी शिरभाते यांनी याप्रकरणी जनतेचे म्हणने ऐकून घेत कागदपत्रे स्विकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित ग्राहकांना दिले.
मूल तालुक्यातील ई गव्हर्नन्स अंतर्गत काही प्रमाणपत्रांचे वाटपही यानिमित्ताने तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयाचे पुरवठा विभागाच्या वतीने याप्रसंगी करण्यात आले.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments
Post a Comment