ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांची माहिती आपल्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता:-प्रा.अशोक झाडे.
ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांची माहिती आपण मिळविली आहे ती आपल्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता:-प्रा.अशोक झाडे.
मूल, दीपक देशपांडे
२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन त्यानिमित्ताने १६ ते २४डिसेंबर मूल तालुका ग्राहक पंचायत शाखा मूलच्या वतीने ग्राहक जागृती सप्ताह साजरा करण्यात आला,
या सप्ताहात ग्राहक पंचायत मूल तर्फे वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना ग्राहक हक्क व ग्राहक संरक्षण अधिनियम समजावून देत जागृती करण्यात आली.
याच अनुषंगाने मूल शहरातील नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयमूल येथेएका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक झाडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राहक पंचायत मूल चे अध्यक्ष दीपक देशपांडे, उपाध्यक्ष अशोक मैदमवार सचिव रमेश डांगरे, तालुका संघटक तुळशीराम बांगरे, मुक्तेश्वर खोब्रागडे, सहाय्यक शिक्षक गुरुदास चौधरी, विजय मेश्राम, सहाय्यक शिक्षिका वर्षा भांडारकर , निलेश माथनकर आदी मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना रमेश डांगरे यांनी हसतखेळत विद्यार्थी मनाचा वेध घेत ग्राहक म्हणजे काय ते पटवून देत प्रबोधन केले व आनंददायी वातावरण तयार केले,
त्यावर ग्राहक संरक्षण कायदा कसा तयार झाला आणि त्याची व्याप्ती अशोक मैदमवार यांनी रेखाटली , सहजगत्या होणारी फसवणूक आपण कशी टाळू शकतो हे तुळशीराम बांगरे यांनी मांडले ,तर शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करताना होणारी फसवणूक आणि ग्राहक संरक्षण कायदा यांची सांगड मुक्तेश्वर खोब्रागडे यांनी कशी घालायची त्यासाठी घ्यावयाची काळजी मोजक्या शब्दात रेखाटली.
गुरुदास चौधरी यांनी आपल्या अनुभवातून ग्राहकांच्या फसवणूक प्रकारांची यादिच समोर ठेवत केवळ आम्हा सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्यांना सुद्धा याबाबत माहिती नसल्याने फसवणूक व शोषणाचे बळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे आणि म्हणूनच हा उपक्रम एक अतिशय स्तुत्य उपक्रम असून असे कार्यक्रम आयोजित करुन खरी ग्राहक जागृती करण्याचे कार्य ग्राहक पंचायत मूल चे पदाधिकारी करीत आहेत त्यांच्या कार्याची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
ग्राहक पंचायत मूल तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी, ग्राहक म्हणजे काय, ग्राहक चळवळीची सुरुवात , ग्राहक संरक्षण अधिनियम आणि त्याची व्याप्ती ,खरेदीविक्रीचे बदललेले स्वरूप आणि फसवणुकीच्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती सादर करताना शाळा महाविद्यालयांत असे कार्यक्रम घेण्याचा उद्देश स्पष्ट करीत शोषणमुक्त समाज निर्माण करायचा आहे त्यासाठी आजचा विद्यार्थी आपल्या हक्काच्या मागणीसाठी तयार झाला पाहिजे आणि आजच फसवणुकीच्या प्रकाराबाबत स्वतः सोबत कुटुंबाची फसवणूक टाळण्यासाठी पुढे आला पाहिजे यासाठी हा शंखनाद असल्याचे स्पष्ट केले.
प्राचार्य अशोक झाडे यांनी, अध्यक्षस्थानावरून बोलताना आपण आतापर्यंत आपल्याला ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांची माहिती आपण मिळविली आहे ती आपल्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे ,ते आपल्या कुटुंबासाठी महत्वाचे आहे आणि आम्ही व आमचे विद्यार्थी ही उपयुक्त माहिती निश्चितच घरापर्यंत, समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन देत उपक्रमाचे कौतुक केले ,व ग्राहक दिनाच्या पूर्वसंध्येला ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिक्षा गुरनुले या विद्यार्थिनींच्या ग्राहक गीत गायनाने झाली, व निलेश माथनकर यांनी सुत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन वर्षा भांडारकर यांनी केले, कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक शिक्षीका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment