लक्षवेधी:-३.अल्पवयीन मुलांच्या हातात दूचाकी, आणि भरधाव वेगाने गाडी चालवणे, आता कुणाच्या खिशाला कात्री लावणार?.

लक्षवेधी:-३.

अल्पवयीन मुलांच्या हातात दूचाकी आणि भरधाव वेगाने गाडी चालवणे,आता कुणाच्या खिशाला कात्री लावणार?



दीपक देशपांडे 

वाहतुक नियंत्रण शाखा ताडोबा रोड, तुकूम,चंद्रपूर ४४२४०१ 

यांचे एक पत्र शाळा/महाविद्यालयाच्या प्राचार्य यांचेसाठी आणि  पालकांसाठी .....

जाक वानिशा/अल्पवयीन विद्यार्थी / दुचाकी चालक / कारवाई / २०२४- दिनांक: २७/१२/२४

प्रति,

प्राचार्य / मुख्याध्यापक

........आपल्याला यापत्राव्दारे सुचित करण्यात येते की, आपल्या शाळा  / कॉलेज मध्ये १८ वर्षाखालील अल्पवयीन विद्यार्थी हे दुचाकीवरून येतात. ही बाब आमच्या निर्दशनास आलेली आहे. अल्पवयीन (१८ वर्षाखालील मुलाला) वाहन चालविण्यास दिल्यास मोटार वाहन सुधारीत अधिनियम २०१९ कलम १९९ A अन्वये पालकांस / मोटार वाहन मालकांस तीन महिण्यापर्यंत कैद / २५,००० रू दंड इतक्या शिक्षेची तरतुद करण्यात आलेली आहे.

तरी आपण आपल्या शाळा / कॉलेज मध्ये वर्ग शिक्षकांमार्फत सर्व विद्यार्थ्याना याची जाणीव करून दयावी, तसेच पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती सदरची सुचना प्रसारीत करावी.

आपल्या शाळा / कॉलेज ला सुचना पत्र प्राप्त झाल्यापासुन ४८ तासाच्या आत सदरची सुचना आपल्याकडुन विद्यार्थी / पालक यांना कळविण्यात यावी. जेणेकरून त्यानंतर कारवाई झाल्यास आमच्या कार्यालयाला पालक / वाहन मालकांची कोणतीही तकार येणार नाही व तकार प्राप्त झाली तरी त्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी.

(प्रविणकुमार पाटील) 

पोलीस निरीक्षक

वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुचना तर दिली आहे पण...या सुचनेचे पालन होणार आहे काय? पाल्य आपल्या पालकांना ही बाब घरी जाऊन सांगणार आहेत काय? पालक आपल्या पाल्यांना या गाड्या चालवण्यापासून दूर ठेवू शकणार आहेत काय?

या सर्व बाबींचा विचार करता केवळ वाहतूक नियंत्रण शाखेचे वतीने कठोर कारवाई सुरू करणे गरजेचे आहे आणि राजकीय मंडळींनी पोलिस कारवाईत हस्तक्षेप करू नये ,तरच ह्या नियमांचे पालन केले जाईल ,अन्यथा  हातात काही येणार नाही.

वाहतूक पोलिस म्हणतील आम्ही सुचना दिली होती ,जनता म्हणेल,हा तर अतिरेकच आहे , आणि पाल्य सुसाट तर पालक बिनधास्त ,मग अशा सुचना निर्गमित करण्यानं काय हशील होणार आहे?


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.