मूल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह??? पण.... मूल येथील खुनाचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याचे साथीदार २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे ताब्यात

 

मूल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह???
पण....
मूल येथील खुनाचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याचे साथीदार २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे ताब्यात
मूल दीपक देशपांडे 
धक्कादायक!
मूल शहर कडकडित बंद,कारण, किरकोळ वाद विकोपाला गेला आणि २८ वर्षीय युवकाची हत्या.

मूल शहरातील किरकोळ वादातून युवकाची चाकूने वार करीत निर्घृण हत्या केली. 
शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास ऋतिक शेंडे वय २८ वर्ष याची चाकूने वार करीत निर्घृण हत्या करण्यात आली होती. ऋतिक शेंडे मूल येथील विहीरगाव परिसरात राहत असून पंचायत समिती समोरील महामार्गावर  काही युवकांनी त्याच्यावर चाकूने वार करुन त्याची हत्या केली,अशी चर्चा होती.
मारेकरी गांजाच्या व्यवसायात गुंतल्याचे बोलले जात आहे,त्यांनी ऋतिक ला थांबवून वाद केला व विरोध केला असता त्याच्यावर ठिकठिकाणी चाकूने वार करण्यात आले.त्याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
अधिक तपास मूल पोलीसांनी सुरू केला होता व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सुद्धा आरोपीच्या मागावर होते.



पोलीस स्टेशन मूलने गुन्हा नोंद करीत प्रकरणाचा माहिती गुन्हा शाखा चंद्रपूर यांना दिली होती.त्यावर तातडीने कारवाई करीत गुन्हा शाखेतर्फे.नं ५१२/२०२४ कलम १०३(१), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये दाखल खुनाचे गुन्हयातील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांचे विविध पथके तयार करून दि.२७/१२/२०२४ रोजी गुन्हा घडलेपासुन अथक प्रयत्नाने सातत्याने आरोपीताचा शोध चंद्रपूर व लगतच्या जिल्हयात घेत असतांना नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी नामे राहुल सत्तन पासवान, वय २० वर्षे, जात परघान (एस.टी), शिक्षण १२ वी, रा. बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं.१५, मूल, ता.मूल.जि.चंद्रपूर, त्याचा साथीदार आरोपी अजय दिलीप गोटेफोडे, वय २२ वर्षे, रा. बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं.१५,मूल, ता.मूल.जि. चंद्रपूर व विधीसंघर्षित बालक यास दि.२८/१२/२०२४ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीतुन ताब्यात घेण्यात आले असुन पुढील कार्यवाहीस्तव पोलीस स्टेशन मूल यांचे ताब्यात देण्यात आले आहे. 


सदरची कारवाई मा.श्री.सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. महेश कोंडावार पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
मूल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मूल पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे परिसरात दारु ,गांजा व अंमली पदार्थांच्या सेवनाने , खुलेआम विक्री मुळे महाविद्यालयीन मूले व तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. अनेक अवैध धंदे या काळात तालुक्यात वाढिस लागल्याची चर्चा कालपर्यंत दबक्या आवाजात होत होती ती आज डोके वर काढून सरेआम चर्चेचा विषय बनली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनी याबाबत दखल घेऊन योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेने केली आहे.

  दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.