राष्ट्रीय सेवा योजनेच्या साप्ताहिक शिबिरात ग्राहक जागृती कार्यक्रम.

 ग्राहक जागृती सप्ताह!

राष्ट्रीय सेवा योजनेच्या साप्ताहिक शिबिरात ग्राहक जागृती कार्यक्रम.



दीपक देशपांडे मूल 

मूल तालुक्यातील चितेगाव येथे  मागील आठवड्यात कर्मवीर महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे  वार्षिक साप्ताहिक शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात दररोज दूपारी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता,याच निमित्ताने ग्राहक पंचायत मूल तालुका शाखा मूलच्या वतीने ग्राहक जागृती सप्ताह पाळला जात होता , परिणामी शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे दृष्टीने ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.केवळ कऱ्हाडे यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी दीपक देशपांडे मूल तालुका ग्राहक पंचायत मूल हे प्रमुख अतिथी तर , अशोक मैदमवार उपाध्यक्ष, रमेश डांगरे सचिव, तुळशीराम बांगरे संघटक,मुक्तेश्वर खोब्रागडे कार्य.सदस्य आदी अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक गीत गायनाने करण्यात आली ,तर रमेश डांगरे यांनी प्रास्ताविकातून ग्राहकांची फसवणूक व फसवणूक पद्धती आणि बचावात्मक कार्य कसे आणि काय करायचे याबाबत माहिती दिली, अशोक मैदमवार यांनी ग्राहक, ग्राहक संरक्षण अधिनियम आणि आजही ग्राहक कसा फसवला जातो याबाबत माहिती दिली तर मुक्तेश्वर खोब्रागडे यांनी  शेतकऱ्यांनी बी बियाणे खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली.

दीपक देशपांडे यांनी ग्राहक, ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक चळवळ आणि ग्राहकाची फसवणूक व  आजचा विद्यार्थी हा आजच्याच नागरिक कसा आहे?हे पटवून देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या मनातील नानाविध प्रश्नांची उत्तरे देताना ग्राहक कायदा कसा जनतेच्या लाभाचा आणि प्रत्येक ग्राहकाला न्याय मिळवून देण्यासाठी सहाय्यक ठरणारा आहे , हे पटवून दिले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.केवल कऱ्हाडे यांनी ग्राहक पंचायत मूल च्या कार्याचा गौरव करीत ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेल्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी सुरू केलेले हे कार्य सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे असून आमच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना आपली फसवणूक टाळण्यासाठी निश्चितच लाभदायी ठरणार आहे, त्यामुळे आज मिळालेली माहिती आमचे विद्यार्थी प्रत्यक्ष आचरणात आणतीलच अशी ग्वाही दिली.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या साप्ताहिक शिबिराचे संयोजक डॉ.संदीप मांडवगडे यांनी ग्राहकांना उद्भवणारे प्रश्न आणि होणारी फसवणूक यांबाबत जागरुकता किती आवश्यक आहे आणि आजच्या जमान्यात फसवणुकीच्या बदललेल्या प्रकारांची माहिती देताना ग्राहक पंचायत मूल च्या कार्याची प्रशंसा करीत पदोपदी फसवणूक लुबाडणूक यांचा सामना केवळ अशिक्षित आणि गरीब जनतेचीच होते असे नाही तर सुशिक्षित उच्चशिक्षित तरुण आणि महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्यामुळे ह्याविषयी जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि म्हणूनच आज ग्राहक पंचायत मूल चे पदाधिकारी यांनी आपल्या या शिबिरात सहभागी होत केलेले मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना व्यवहार करताना फसवणूक टाळण्यासाठी निश्चितच मदत करणार आहे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सिडाम याने केले, दीपप्रज्वलन करून व पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर शिबिरार्थी विद्यार्थिनींनी ग्राहक गीत गायनाने सुरुवात केली , त्यानंतर महाविद्यालयाच्या स्मरणिकेने व पुष्पगुच्छ देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले, आभार प्रदर्शन संघर्ष  गजभिये यांनी केले.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.