मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. केंद्र सरकारचा निर्णय

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. केंद्र सरकारचा निर्णय.

दीपक देशपांडे.


 केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे  मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे.

'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके....' असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे. मराठी भाषेला जवळपास २००० वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातंय.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी २०१३ सालापासून प्रयत्न केले जात होते. त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती. 

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात 

१) संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान १५००-२००० वर्षे प्राचीन असावा. २) या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे.                                   ३) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.  ४) प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.

 अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

१) अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.       २) अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.                                                      ३) प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

२००४ मध्ये देशातील तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली.

तामिळनंतर २००५ मध्ये संस्कृत, २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगू,२०१३ मध्ये मल्याळम, २०१४ मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. 

देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता. त्यांची संख्या वाढून आता ११झाली आहे.

   दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

     ✍️Ddbatmi@m2M✍️       


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.