निवडणूक निरीक्षक संगीता सिंग (IAS) यांचा ७२ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीचा आढावा
निवडणूक निरीक्षक संगीता सिंग (IAS) यांचा ७२ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीचा आढावा
दीपक देशपांडे
दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी मा. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने नियुक्त निवडणूक निरीक्षक आदरणीय संगीता सिंग (IAS) यांनी ७२ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेट देण्याच्या अनुषंगाने निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
मा. निवडणूक निरीक्षक शासकीय विश्रामगृह, मूल येथे पोहोचताच त्यांचे स्वागत मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. अजय चरडे, सहायक निवडणूक अधिकारी मृदुला मोरे आणि मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी केले. स्वागतानंतर मा. निवडणूक निरीक्षकांनी मतदारसंघातील निवडणूक तयारी, मतदारांना उपलब्ध सुविधा आणि सुरक्षाव्यवस्था याबाबत प्राथमिक माहिती घेतली.
यानंतर त्यांनी मूल शहरातील नवभारत विद्यालय, बालविकास शाळा आणि नगर परिषद कार्यालय येथील मतदान केंद्रांवर भेट देऊन किमान आश्वासित सुविधा (Minimum Assured Facilities) तपासल्या आणि मतदारांसाठीच्या सुविधांचा आढावा घेतला. आवश्यकता असल्यास काही सुधारणा करण्याच्या सूचना मा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या.
त्यानंतर मा. संगीता सिंग यांनी मूल तालुक्यातील चिमढा येथील मतदान केंद्रांवर भेट देऊन, तेथील मतदान सुविधांची पाहणी केली. त्यांनी दुर्गम आणि आदिवासी भागातील मतदारांसाठी सुविधा सुनिश्चित करण्यास महत्त्व दिले, यासाठी पोंभूर्ना तालुक्यातील डोंगर हळदी, चेक अंबे धानोरा व उमरी पोतदार या दुर्गम गावांतील मतदान केंद्रांनाही त्यांनी भेट दिली.
चंद्रपूर तालुक्यातील अतिसंवेदनशील पिंपळखुट मतदान केंद्राची देखील त्यांनी पाहणी केली, जिथे अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले.
संपूर्ण दौऱ्यात मा. संगीता सिंग यांनी मतदारांसाठी सुरक्षित, पारदर्शक आणि सुविधा-संपन्न निवडणूक प्रक्रियेवर विशेष लक्ष दिले. भारत निवडणूक आयोग मतदारांसाठी एक आदर्श मतदान वातावरण तयार करण्यास कटिबद्ध आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी दौऱ्यादरम्यान प्रशासन व निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. मतदारांसाठी कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी मतदान केंद्रांवर स्वच्छता, पाण्याची सुविधा, रॅम्प, शौचालय तसेच दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था यासारख्या आवश्यक सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय, दुर्गम आणि अतिसंवेदनशील भागांमध्ये मतदारांची उपस्थिती वाढवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले. या दौऱ्याद्वारे आयोगाच्या मार्गदर्शनानुसार निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेला आणि मतदारांसाठी सुविधा-संपन्न वातावरण निर्मितीस प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2m✍️
.jpg)
Comments
Post a Comment