मूल तालुक्यातील निराधार योजनेच्या १९७प्रकरणांना मंजुरी

  मूल तालुक्यातील निराधार योजनेच्या १९७प्रकरणांना मंजुरी.

कुणाच्या सांगण्यावरून कुणी केले ते कृत्य? न उमगलेले कोडे. सखेद पूर्णविराम.


मूल , दीपक देशपांडे 

निराधार योजना समितीच्या  अध्यक्षा वंदना अगरकाटे यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय,मूल येथे  दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी दूपारी  १.०० वाजता संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ  योजना समितीच्या मासिक सभेचे  आयोजन करण्यात आले होते. 

सदर सभेमध्ये संजय गांधी निराधार योजनेची पात्र प्रकरण ७८ नामंजूर प्रकरण ० एकूण मंजूर प्रकरण ७८ ,इंदिरा गांधी विधवा योजना पात्र  प्रकरण ०९ नामंजूर प्रकरण ० एकूण मंजूर प्रकरण ०९,इंदिरा गांधी अपंग योजना पात्र प्रकरण ०, श्रावण बाळ योजना  पात्र प्रकरण ११२ मंजूर प्रकरण १०१ नामंजूर प्रकरण ११ एकूण प्रकरण ११२ ,वृध्दापकाळ योजना ०९ पात्र प्रकरणं०९ नामंजूर प्रकरण ० एकूण  मंजूर प्रकरण ०९ अशी  एकुण  पात्र प्रकरण२०८, त्यापैकी मंजूर  प्रकरणे १९७ नामंजूर प्रकरणे ११.

या सभेला समितीचे अध्यक्ष व इतर सदस्य यांनी उपस्थित राहून  प्रकरणे मंजूर/नामंजूर करण्यात आले.या सभेत योजनांबाबत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेत , निराधार योजना समितीच्या अध्यक्षा वंदना अगरकाटे यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे सांगत योजनेसंबंधाने काही अडचणी असल्यास तहसील कार्यालयाचे कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी व दलालापासून सावध राहावे, असेही आवाहन केले.सभेला तहसीलदार मृदुला मोरे, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य,पूजा डोहणे,राकेश ठाकरे, नामदेव कावळे,मुन्ना कोटगले, अनूप नेरलवार, यांचेसह संजय गांधी निराधार योजनेच्रे कर्मचारी,उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी कुणीतरी समाज माध्यमांवर एक संदेश वायरल करीत निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात त्यांचे कागदपत्रे सादर करण्याची सुचना देण्यात आली होती , त्यात  लाभार्थी यादी सोबतच लाभार्थ्यांचे फोन नंबर व बॅंकेचे खातेक्रमांकही दिलेले होते , यावर आम्ही लाभार्थी यादी जाहीर करण्याबाबत लाभार्थ्यांच्या तक्राररुपी समस्या २१सप्टेंबर २०२४ रोजी मांडल्या होत्या त्या बातमीचा मथळा होता.

अखेर प्रशासकीय यंत्रणेलाही समाजमाध्यमांचाच आधार पण....? व त्याची लिंक आहे.

https://ddbatmim2m.blogspot.com/2024/09/blog-post_21.html

तो विषय या बैठकीत चर्चेलाच येवू नये ,ही आश्चर्याची बाब म्हणून जनता  सखेद आश्चर्य व्यक्त करीत आहे,यांचा अर्थ तो संदेश कुणाच्या सांगण्यावरून वायरल  करण्यात आला हे गुढ कायमच राहिले आहे , त्याबाबत   आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.शासकीय यंत्रणा अशी चूक करुच कशी शकते आणि ही चूक करणाऱ्याला सुधारण्याची सक्त ताकीद देणे तर दूरच पण या विषयावर साधी चर्चाही होऊ नये म्हणजे यांत नक्कीच काहीतरी दडलंय! असे मानायला वाव आहे? असे ठणकावून सांगत आम्हाला  वाद वाढवायचा नाही परंतू असा प्रकार पुन्हा होऊ नये याची संबंधितांनी काळजी घ्यावी अशी निराधार लाभार्थी   तक्रारकर्ते  सदस्यांनी सुचना केली आहे.

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

     ✍️Ddbatmi@m2M✍️




Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.