बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संतोष रावत यांचे नामांकन पत्र दाखल.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून संतोष रावत यांनी नामांकन पत्र मोठा गाजावाजा करीत दाखल केले.
मूल ,दीपक देशपांडे
७२ बल्लारपूर विधानसभा मतदारक्षेत्राची निवडणूक २०नोव्हेंबर २०२४ ला होऊ घातली आहे, त्यासाठी श्री. संतोषसिंह रावत यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून 'नामांकन अर्ज दिनांक २९/१०/२०२४ रोजी उपविभागीय अधिकारी मूल यांचेकडे शेवटच्या क्षणी दूपारी तीन वाजता सादर केला, संतोष रावत हे मूल नगरपरिषद चे सदस्य, नगराध्यक्ष , मूल कषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ,चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सध्याचे चं. जि. मध्य. सह. बँक चंद्रपूर चे अध्यक्ष बनण्यापूर्वी ते भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ता ते काॅंग्रेसचे वरीष्ठ नेते असा राजकीय प्नवास करीत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नागपूर रोड वरील रम्य ज्योत लॉन येथे आयोजित महासभेतून संबोधून या सभेचे रूपांतर महारॅलीत होत ढोल ताशांच्या गजरात रॅलीने प्रशासकीय भवनापर्यंत पोहोचले, तेंव्हा प्रशासनाने शेवटची पाच मिनिटे शिजवा असल्याची उद्घोषणा केली होती, आणि बाहेर रस्त्यावर पोलिसांनी कठडे लावून मार्ग बंद करून ठेवला होता. यावेळी काही क्षणांसाठी उपस्थित जनसमुदायाने थोडीशी गर्दी केली होती,मात्र पोलिसांनी हा सर्व जनसमुदाय अडवून धरला होता.यावेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य जनसमुदाय या रॅलीत सहभागी झाला होता.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्ष नेते श्री. विजयभाऊ वडेट्टीवार हे सुद्धा रॅलीत सहभागी होऊन प्रशासकीय भवनात उपस्थित झाले होते. माझा आजवरचा कार्यकर्ता म्हणून लोकसेवेचा पिंड असून मी विविध उपक्रम राबवून जनतेची सेवा करीत आहे. आरोग्य शिबीरे, बचत गट शिबीरे घेऊन जनतेला आरोग्य सेवेचा व बचत गटांतील महिलांना अनेक लाभ मिळवून दिले. पिक विम्यासाठी व वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावे यासाठी शेतकऱ्यांना घेऊन आंदोलने केली. कॅन्सरग्रस्त व मोठ्या दुर्धर आजाराने ग्रस्त रोग्यांच्या मदतीला धावून जाऊन आर्थिक व इतरही मदत केली. लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. असे अनेक समाजसेवेचे कार्य केले. यानंतरही आपण माय बाप मतदारांनी मतदान करून आमदार म्हणून निवडून देत साथ दिली तर यापेक्षाही अधिक जोमाने कार्य करीत राहीन असेही ते म्हणाले. जनता बेरोजगारी, महागाई इत्यादीस वैतागली असून जनतेला सरकार मध्ये बदल पाहिजे आहे. त्यामुळे मतदार बंधू आणि भगिनी माझ्या पाठीशी खंबीर पणे उभी राहून मतदानाच्या रूपाने मला आशीर्वाद नक्कीच देतील, असेही ते म्हणाले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी जनतेची सेवा करण्यासाठी जनतेनी मला साथ द्यावी. मी सदैव आपल्या सेवेत कार्यरत राहीन,असेही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला आश्वासन दिले.
महारॅलीतून मार्गक्रमण करीत असतांना गांधी चौकात गांधींच्या प्रतीमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर बसस्थानकाचे समोर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली,यावेळी रॅलीचा पहिला गट प्रशासकीय भवन परिसरात पोहोचला होता तर शेवटचे टोक गांधी चौकात होते, मधल्या मार्गात तुरळक प्रमाणात लोकांनी रस्ता फुलून गेला होता.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment