आखाडा निवडणुकीचा:- आधी विरोध मग पक्षांतर/पक्षप्रवेश आणि आता परस्पर सहकार्य?

 आखाडा निवडणुकीचा:- आधी  विरोध मग पक्षांतर/पक्षप्रवेश आणि आता परस्पर सहकार्य?

दीपक देशपांडे 



चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारण दररोज नवनवीन वळणं घेत असतांनाच चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवारांच्या भाजपच्या पक्षप्रवेशाला  कडाडून विरोध करीत थेट दिल्ली दरबारात दाखल होणाऱ्या भाजपच्या हेवी वेट नेत्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेच उपस्थितीत आमदार किशोर जोरगेवारांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यात आला  आणि जिल्ह्याच्या राजकारणात एक नवीन अध्याय लिहिला गेला ,हा अध्याय इथेच थांबला नाही तर काॅंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा म्हणून भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर जातीयवादी राजकारणावरुन आरोप करणाऱ्या नम्रता आचार्य ठेमस्कर यांनाही भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यात आला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होऊन त्यांना  माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांचेसह जिल्ह्यातीलप्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश देण्यात आला.

दोन दिवसांपूर्वी घडलेला प्रकार विसरुन दोन्ही नेत्यांनी पक्षबळकटीसाठी घेतलेला निर्णय आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तयार कार्यकर्ते  जर एकत्रीत येऊन निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेत तर भाजपाची ताकद वाढणारच आहे याबाबत कार्यकर्ते निःसंशय असणार आहेत.

आता एकमेकांचे सुर जुळवून जर सगळे आजी माजी कार्यकर्ते मतभेदाची दूरी विसरून कामाला लागले तर विखुरलेल्या इंडी आघाडीतील बेबनाव जनतेसमोर ठेवण्यात यशस्वी होतीलच अशी आशा आज एनडीए हाॅटेल परिसरात जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्यासोबत वार्तालाप करताना मनमोकळेपणाने स्पष्ट केले.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक

     ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.