निवडणूक आखाडा,आम्ही लढणारच. ! महाविकास आघाडीच्या चार इच्छुक उमेदवारांनी कथन केली आपली आपबिती.

 निवडणूक आखाडा, आम्ही लढणारच !

दीपक देशपांडे 



बहुजनांच्या हक्क आणि अधिकारासाठी आम्ही बल्लारपूर विधानसभा  निवडणूक लढणारच ! महाविकास आघाडीच्या चार इच्छुक उमेदवारांनी कथन केली आपली आपबिती......

डॉ अभिलाषा राकेश गावतुरे. 

प्रबळ दावेदारांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद,असे म्हणत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मागील  लोकसभा निवडणुकीपूर्वी काॅंग्रेसच्या गोटात प्रवेश घेतलेल्या राकेश गावतूरे आणि अभिलाषा  गावतूरे यांना महाविकास आघाडीने बाहेरचा रस्ता दाखवला  आणि आजवर केलेल्या पायाभरणी चार असा सन्मान  केला याबाबत नाराजीचा सूर आवळत यांनी दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

आणि... प्रकाश पाटील मारकवार 

महाविकास आघाडीने नाकारले असले तरीही आजवरचे आमचे प्रयत्न तसेच जनतेचे समर्थन आणि आम्ही केलेल्या जनसंपर्काची आणि त्यातून जनतेच्या समस्या जवळून बघितल्यावर त्या जनतेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले आहोत ,असे म्हणत प्रकाश पाटील मारकवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तर..... संदीप गिऱ्हे ...

आघाडीच्या वतीने दिलेला शब्द न पाळता आपल्याला उमेदवारी नाकारली म्हणून सर्व सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे शिवसेना उबाठा चे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे ,मात्र शेवटी पक्षादेश पाळणे अधिक महत्वाचा असे स्पष्ट करीत संदीप गिऱ्हे यांनी उमेदवारी दाखल केला आहे. 

असे असताना..... संतोष रावत ...

सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी ,शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य सेवा, शेतकऱ्यांचे प्रश्न, वनविभागाच्या समस्या, उद्योग निर्मिती, घरकूल,घरांचे बांधकाम, एकंदरीत अंधेरनगरी चौपट राजा अशी सध्याच्या सरकारची स्थिती असल्यामुळे ही स्थिती बदलण्यासाठी मी आपल्या गावातील उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार  म्हणून बोलताना संतोष रावत यांनी सोमनाथ टाॅवरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून दिली ,आणि नंतर ते उमेदवारी दाखल करण्यासाठी रवाना झालेत. निवडणूक मिरवणूक काढून शेवटच्या क्षणी प्रशासकीय भवनात दाखल झाले व उमेदवारी अर्ज सादर केला ,या निमित्त्ताने एक  आघाडी आणि त्यातील बिघाडी जनतेसमोर फेर धरुन नाचू लागली आहे 

आता घोडाबाजार तेज होऊ लागला असून प्रत्येक उमेदवार आपली बाजू सत्याची असल्याचे सांगत सुटणार आहेत. अशा स्थितीत जे कानाने ऐकून खरे मानण्यापेक्षा नजर चौफेर फिरवीत आपल्यापुढे एकसत्य असणार आहे,ते सत्य स्विकारुन तसा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

आजवर एकत्रितपणे भाजपा विरोधात दंड थोपटून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले एका इंडी आघाडीतील घटकपक्ष आघाडी धर्म विसरुन केवळ सत्ता प्रस्थापित करण्यासाठी एकत्रीत आले होते की सत्तेच्या लोभाने परस्पराविरोधात निवडणुकीच्या समरांगणात उतरले आहेत,हा संशोधनाचा विषय आहे,परंतू हे सगळे उमेदवार नेते आधी परस्पर विरोधात आणि नंतर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत हे न समजण्याएवढी जनता नासमज नक्कीच नाही,अशी चर्चा प्रशासकीय भवन परिसरात ऐकायला मिळाली.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक

      ✍️Ddbatmi@m2m✍️





Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.