दुसऱ्या दिवशी शुन्य नामांकन दाखल परंतू नामांकन पत्राची उचल ४ डझनांवर!

 आखाडा निवडणुकीचा:-

७२, बल्लारपूर विधानसभा मतदार संघ दुसऱ्या दिवशी शुन्य नामांकन दाखल परंतू नामांकन पत्राची उचल ४ डझनांवर!



दीपक देशपांडे 

दिनांक- २३/१०/२०२४ रोजी बल्लारपूर मतदारसंघात निवडणूक संबंधाने बरीच चहलपहल बघायला आणि ऐकायला मिळाली,काल सायंकाळी इंडी आघाडीत येथील उमेदवारी शिवसेना उबाठा गटाला मिळणार अशी चर्चा ऐकायला मिळाली आणि ती सिट शिवसेनेच्या  वाट्याला गेल्याने काॅंग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली होती .

कारण ती आज सकाळी सकाळी येथील उमेदवारी काॅंग्रेसच्या वाट्याला आल्याच्या चर्चेने शिवसेना गटात अस्वस्थता घेऊन आली तर काॅंग्रेसच्या एका गोटात आनंद तर दुसऱ्या गोटात अस्वस्थता निर्माण करुन गेली, विविध माध्यमांतून ही बाब प्रसारीत झाल्याने काॅंग्रेसच्या वरीष्ठांशी संपर्क करणाऱ्यांनी आपापली बाजू पुढे ठेवायचा प्रयत्न केला आणि पुन्हा सायंकाळी एक नवीनच बाब पुढे आली आणि या दोन्ही गटातील अस्वस्थता शिगेला पोहोचली असून या निर्णयामुळे इंडी आघाडीतील बिघाडीच काय तो चर्चेचा विषय ठरला आहे.

अशा स्थितीत राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आज एकूण वितरित अर्जाची संख्या एकूण १७ व्यक्तींनी ४८अर्जांची उचल केली आहे  ,हे बघून निवडणूक लढू इच्छिणाऱ्या आणि शेवटपर्यंत आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने प्रेरीत इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपणच योग्य उमेदवार असल्याचा दावा कायम ठेवल्याचे चित्र उभे राहिले आहे.

मात्र आज दुसऱ्या दिवशीही प्राप्त नामनिर्देशन अर्जाची संख्या शुन्यच(निरंक) आहे.

प्राप्त माहितीनुसार उद्या गुरुवारी एखाददुसरा अर्ज दाखल केला जाण्याची आणि आपली उमेदवारी निश्चित करण्याची सुरुवात केली जाऊ शकते, आणि शुक्रवारी यात भर पाडली जाणार असली तरीही  बहुतांश नामांकनपत्र सोमवार -मंगळवारीच दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मूल येथील प्रशासकीय भवनात नामांकन पत्र दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी ११ते दूपारी तीन वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना प्रशासकीय भवन परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे, निवडणूक कार्यात सहभागी कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र असल्याशिवाय परिसरात प्रवेश नसणार आहे  तसा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 आज अचानक हा निर्णय जाहीर झाल्याने प्रशासकीय भवनात कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांना आल्यापावलीच माघारी परतावे लागले आहे , याबाबत नागरिकांनी काहिशी नाराजी व्यक्त केली.

चला निवडणुकीच्या समरांगणात आजच्या दिवसाची ही कहाणी उद्या नेमकं काय घडणार याची उत्सुकता वाढवून गेली आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक

     ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.