निवडणूक आखाडा भाग१:-अखेर उमेदवारी कोणाला मिळणार?

 निवडणूक आखाडा २०२४भाग१

अखेर उमेदवारी कोणाला मिळणार? चर्चेला उधाण!



दीपक देशपांडे 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अखेर दिनांक १५/१०/२०२४रोजी दूपारी चारचे दरम्यान अधिकृत घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली,व आचारसंहिता लागू झाली.

कालपर्यंत संगीत खुर्चीचा खेळ खेळणाऱ्या राजकीय पक्ष व निवडणूक पूर्व राजकीय आघाडी वा युतीतील रस्सीखेच अंतिम टप्प्यात आली आणिआता आपल्या वर्चस्वाची लढाई सुरू झाली व उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतीम रुप घेऊ लागण्यापूर्वी एक शेवटचा प्रयत्न करण्याची जणू अहमहमिका सुरू झाली आहे.

राजकीय नेतेमंडळी राजकीय विश्लेषक व पत्रकारांशी संवाद साधून नक्की उमेदवारी कोणाला मिळणार?याची शहानिशा करु लागले आहेत अगदी कालपर्यंत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेले आणि आमदारकीची स्वप्ने बघणारे धुरंधर नेतेही काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने युती व आघाडीचा आधार घेणारेही आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची वाट बघत आपली उमेदवारी मिळण्याची शक्यता चाचपडत जनसंपर्क साधत आहेत ,तर काही स्वतंत्रपणे लढण्याची भाषा वापरत दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही अनिश्चितता बऱ्याच मतदारसंघात कायम असणार आहे , त्यामुळे उमेदवारी मागणाऱ्यांना अखेर पर्यंत आपली उमेदवारी टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीतच राहावे लागणार आहे.अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

आज निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार स्थानिक मतदारसंघात तेथील निवडणूक निर्णय अधिकारी राजकीय नेतेमंडळी व पत्रकार यांच्या बैठकीत निवडणूक आचारसंहिता व त्यातील महत्त्वाच्या बाबी यांची माहिती सादर करीत या आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना करणार आहेत .

त्यांचे कितपत पालन करायचे आणि कितपत टाळायचे हे मात्र उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हेच ठरविणार आहेत, सक्षम निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला कोण पुढे येणार?त्यावर किती तातडीने उपाययोजना केली जाणार?हे मात्र बघण्यासारखे असणार आहे.

चला बघूया,आता घोडे मैदानात उतरणार असून कोणाची घोडदौड कशी असणार आहे?हे बघण्यासारखे आहे,त्याची बित्तंबातमी आम्ही या काळात तुमच्या समोर घेऊन येणार आहोत.

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

     ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.