लक्षवेधी. मूलची पाणी समस्या!भाग २ भाजपचा घागर मोर्चा,त्यावर सत्ताधारी काँग्रेस ची पत्रकार परिषद:-एक आकलन आणि चिंतन.
लक्षवेधी.
मूलची पाणी समस्या!भाग २ भाजपचा घागर मोर्चा,त्यावर सत्ताधारी काँग्रेस ची पत्रकार परिषद:-एक आकलन आणि चिंतन.
बुधवार दिनांक १७जून रोजी दुपारी बारा वाजता भाजपचे वतीने स्थानिक रामलीला भवन परिसरातून निघालेला घागर मोर्चा नगरपरिषद कार्यालयात दाखल झाला, या मोर्चात प्रतिकात्मक रिकाम्या घागरी ठेवून त्याची शवयात्राही काढण्यात आली आणि नगरप्रशासनाच्या कार्यप्रणाली बाबत निषेध करणारी नारेबाजी ही करण्यात आली मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले, याप्रसंगी घागरी नगरपरिषद कार्यालयासमोर फोडण्यात ही आल्या, यावर उपाययोजना करीत तोडगा काढून पाणीपुरवठा सुरू असल्याचे मत मुख्याधिकारी यांनी शिष्टमंडळाला सांगितले होते ,व यानंतर एक प्रेस नोट प्रसिद्धी ला देत स्पष्टीकरण दिले होते.
ह्यात काय होते?.... प्रेस नोट अशी.
नेहमी निर्माण होणारी विजपुरवठा खंडित होण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची बाब मान्य करीत नवीन होणाऱ्या विज केंद्राच्या पूर्णत्वानंतर १३२केव्ही.विजकेंद्राला ही लाईन जोडल्यानंतर हा विषय राहणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले. भविष्यातील पाणीपुरवठा व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील, असेही सांगण्यात आले.
एकंदरीत मुळ विषय पाणीपुरवठा खंडित होण्यामागील कारणांबाबत माहिती देताना नगराध्यक्षांनी सांगितले की, हरणघाट येथून शहराला पाणीपुरवठा केला जातो. अलीकडील वादळी वाऱ्यामुळे वीज खांब व तारा तुटल्याने चार दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पाणी पुरवठा केंद्राचे काम बंद झाले. त्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर विद्युत दाबातील चढ-उतारामुळे पॅनल बोर्डवरील यांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाला होता मात्र आमच्या सहकारी नगरसेवक व नगरपालिका कर्मचारी यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर तो सुरळीत करण्यात आला, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खुलासाही केला असून त्याची प्रत प्रेसनोट सोबत जोडलेली होती. त्यामुळे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने १७ जूनपासून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जुन्या पाईपलाईनमध्ये एकूण १२ ठिकाणी गळती आढळून आली होती. त्यापैकी ९ ठिकाणांची दुरुस्ती पूर्ण झाली असून उर्वरित ३ ठिकाणची कामेही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
तसेच पाणी उपसा केंद्रावरील ७५ एचपी क्षमतेची मोटार दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून पर्यायी व्यवस्था म्हणून ७५एचपी व ९० एचपी क्षमतेची स्टँडबाय मोटारही दुरुस्त करून सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. भविष्यात तांत्रिक बिघाड झाल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
"पाणीपुरवठा खंडित होण्यामागे नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक बिघाड कारणीभूत होते. शहरवासीयांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा देण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध असून या प्रश्नावर राजकारण करण्याऐवजी काऐयमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे," असे नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष सौ. एकता समर्थ, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती राकेश रत्नावार, विलास कागदेलवार पाणी पुरवठा सभापती, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, शिक्षण सभापती ललिता फुलझेले, महिला व बाल कल्याण सभापती नलिनी आडपवार ,रितिक गोयल,अतुल गोवर्धन, तुकाराम गुरनुले, बंडू गुरनुले, व इतर महिला नगरसेविका आदी उपस्थित होते.
उर्वरित भाग ....पुढिल अंकात....
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️


Comments
Post a Comment