अवैध बनावट प्रतिबंधित सुगंधी तंबाखू निर्मिती कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन मूलचा छापा
अवैध बनावट प्रतिबंधित सुगंधी तंबाखू निर्मिती कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन मूलचा छापा एकूण ९,८५ ,४४५/--रू चा माल जप्त
दीपक देशपांडे.
दि.१६/०६/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, इसम नामे तोहिद शेख, रा वॉर्ड नं.१४ मूल याने स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित तम्बाकू व पानमसाला विक्री करीता बाळगला आहे
तसेच घरी बनावट सुगंधित तंबाखु तयार करीत आहे, अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन मूल येथील अधिकारी / अंमलदार यांनी रेड केली असता आरोपी नामे मोहम्मद तोहिद मोहम्मद आरिफ, वय २७ वर्ष, रा.वॉर्ड नं.१७ ताडाळा रोड,मूल ता .मूल,जिं चंद्रपूर याचे राहते घरी बनावट सुगंधित तंबाखु तयार करण्याचे साहित्य,मशीन व महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला तंबाखु व पानमसाला साठा, वाहतुकसाठी वापरलेली कार क्रमांक एमएच-२७ बीव्ही--२९०७ असा एकूण ९,८५,४४५/-रू चा
माल जप्त करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही कामी आरोपी व जप्त मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांनी दिलेल्या तकारीवरून आरोपीविरूध्द भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन मूल करीत आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री .आयुष नोपानी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा.श्री.ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्री.सत्यजित आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी मूल यांचे मार्गदर्शनात श्री.अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व श्री विजय राठोड पोलीस निरीक्षक,मूल यांचे नेतुत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि रूपेश कृुंभरे, पोलीस अंमलदार धनराज करकाडे, जंयत चुनारकर, चेतन गज्जलवार,सुरेंद्र महंतो,सुमित बरडे , गारघाटे ,किशोर वाकाटे,दिपिका सोडणार व सायबर पोलोस स्टेशन चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment