एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात, दोन मजूर ठार.
ताडोबा बफर झोन क्षेत्रात एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात, दोन मजूर ठार
मूल (चंद्रपूर) दीपक देशपांडे.
बांबू कटाईचे काम करताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या पाऊण तासाच्या फरकाने झालेल्या वाघाच्या हल्ल्यात दोन मजूर ठार झाले. शनिवारी ताडोबाच्या बफर क्षेत्रातील मामला व महादवाडी परिसरात या घटना घडल्या. प्रेमसिंग दुखी उदे (वय ५५, रा. बालाघाट), बुदसिंग श्यामलाल मडावी (वय ४१, रा. मुंडला, बालाघाट) अशी मृतांची नावे आहेत.
बफर क्षेत्रात बांबू कटाईचे काम सुरू आहे. वनविभागाने बालाघाट येथून कामासाठी मजूर बोलावले आहेत. काही मजूर महादवाडी बिटात तर काही मामला बिटात बांबू कटाईचे काम करत आहेत. मामला बिटातील कक्ष क्रमांक ३८१ मध्ये दुपारी ३.४५ च्या सुमारास बांबू कटाईचे काम करण्यात मग्न असलेल्या बुदशिंग श्यामलाल मडावी यांच्यावर अचानकपणे वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना ताजी असताना व याबाबत चौकशी सुरू असतानाच पाऊण तासाच्या फरकाने या घटनास्थळापासून काहीच अंतरावर महादवाडी बफर झोन कक्ष क्रमांक ३५७ मध्ये प्रेमसिंग दुखी उदे यांच्यावर दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले.
या दोन्ही घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग त्यांनीच कामाला लावलेल्या मजूरांना संरक्षण देऊ शकत नाही तर सर्वसामान्य नागरिकांना ते संरक्षण कसे देणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली असून वनविभागाद्वारे तातडीने या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरून पुढे आली आहे.
दिवसेंदिवस वनविभागाच्या विरोधात वातावरण तापत असून वनविभाग अजून किती नागरिकांचे नाहक बळी घेणार?व वन्यप्राणी व मानव संघर्ष शिगेला जाणार याबाबत राजकारणी मंडळी मुग गिळून गप्प का बसले आहेत असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment