कर्मवीर महाविद्यालय मूल येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा
कर्मवीर महाविद्यालय मूल येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा
मूल - दीपक देशपांडे
शिक्षण प्रसारक मंडल मूल द्वारा संचालित , गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे राज्यशास्त्र विभाग, एनसीसी,एनएसएस तसेच तहसील कार्यालय मूल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यामध्ये लोकशाही तसेच मतदानाबाबत जनजागृती व्हावी,मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने दिंनांक २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मान.अजय चरडे उपविभागीय अधिकारी मूल विचारपिठावर विराजित होते तर अध्यक्ष म्हणून डॉ.अनीता वाळके प्राचार्य कर्मवीर महाविद्यालय मूल, आणि प्रा.प्रवीण उपरे,प्रा. इस्तारी पडोळे प्रा.घनशाम डोंगरवार,डॉ.गणपत आगलावे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.प्रवीण उपरे यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य स्पष्ट केले.तसेच उज्वल भविष्य घडविण्यात मतदारांचा महत्वाचा वाटा असतो.त्याकरिता विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाही आणि मतदान प्रक्रिया माहीत असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.मान.अजय चरडे उपविभागीय अधिकारी मूल यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व अधोरेखित करताना म्हटले की आपले अमूल्य मत योग्य उमेदवाराला देऊन लोकशाहीच्या मजबुतीकरिता निस्वार्थी आणि निष्पक्षपाती मतदान झाले पाहिजे.त्याकरिता जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून आपले राष्ट्रीय कर्तव्य जबाबदारी समजून पार पाडली पाहिजे तसेच शासन आपल्यादारी आले आहे.कागदपत्रे तयार करण्याकरिता आपल्याला तहसील कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही .आपले सरकार नावाचे ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे आपण कागदपत्रे घरबसल्या अपलोड करुन तयार करता येते असे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपण सर्व भारतीय नागरिक आहो, मतदानाचा अधिकार हे आपले कर्तव्य आपल्याला संविधानाने दिलेले आहे . हे शस्त्र असून त्या शस्त्राचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे तसेच आपल्या उज्वल भविष्याचा विचार करून आपला मतदानाचा अधिकार आपले कर्तव्य समजून बजावायला पाहिजे.सोबतच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मतदान नोंदणी करण्याचे आव्हान त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.सिकंदर लेनगुरे तर आभार डॉ.गणेश आगलावे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्राध्यापकवृंद, शिक्षेकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment