मराठीचा दैनदिन व्यवहारात वापर केला पाहिजे:-न्यायाधिश पंकज अहिर.
मराठीचा दैनदिन व्यवहारात वापर केला पाहिजे:-न्यायाधिश पंकज अहिर.
आपल्या मातृभाषेला मराठीच्या लेकरांनी जपले पाहिजे ! -प्राचार्या डॉ.अनिता वाळके.
मूल, दीपक देशपांडे
आज दि.२८ जानेवारीला शिक्षण प्रसारक मंडळ मूल, द्वारा संचालित, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्याने व्याख्यानमाला व समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मराठी भाषेचे महत्व विशद करतांना कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अनिता वाळके म्हणाल्या की,आपल्या मराठी भाषेची अविटगोडी तिच्या पुर्ण सौंदर्यानीशी जिवंत राहिली पाहिजे आणि याची जबाबदारी आपल्या सर्वाच्या खांद्यांवर आहे.आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो ,वाढलो पण आम्ही अन्य भाषेला अधिक महत्व देऊन आपल्या मातृभाषेला दुय्यमत्व देतो ,ही दुटप्पीपणाची भुमिका नष्ट झाली पाहिजे. आपल्या भावना व विचार मातृभाषेतून जेवढ्या सहजतेने इतरांपर्यंत पोहचविता येतात ते आत्मसात केलेल्या भाषेतून घडून येत नाही असे मत व्यक्त करतानां त्या पुढे म्हणाल्या की, संत-महंतांनी मराठीची थोरवी विशद केली आहे ,मराठीला हजारो वर्षाचा इतिहास लाभला आहे तसेच कर्नाटक मधील श्रवणबेळगोळ येथे मराठीत शिलालेख मिळणे हे प्राचीनत्व सिद्ध करणारा ऐतिहासिक पुरावा आहे आणि या वर्षी नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने देश नाही तर जागतिक पातळीवर मराठीचा नावलौकिक झाला आहे असा गुणगौरव त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला .
या प्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.ॲड.अनिल वैरागडे,अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मूल, प्रमुख अतिथी न्यायधिश मान. पंकज अहीर,दिवानी फौजदारी न्यायालय मूल,प्राचार्या डॉ.अनिता वाळके मॅडम प्रा.बनकर ,प्रा.झाडे उपस्थित होते.यावेळी प्रमुख अतिथी मा.न्यायधिश अहीर यांनी मराठी विषयी आपले मत व्यक्त करतानां म्हणाले की,मराठीचा दैनदिन व्यवहारात वापर केला पाहिजे तसेच संतांपासून तर विचारवंता पर्यंत मराठीतील अजरामर साहित्य वाचून विद्यार्थानीं आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास केला पाहिजे असा मौलिक सल्ला दिला. अध्यक्ष ॲड.वैरागडे यांनी मराठी भाषेची खरी जबाबदारी तरुण विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाची असून विद्यार्थामध्ये मराठी विषयी रुची वाढविण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा व उपक्रम राबवावे व मातृभाषेतून सवांद साधुन ज्ञानदानाचे कार्य करावे असे मार्गदर्शनपर सुचक विधान केले. मराठी विभागाचे प्रा.भूषण वैद्य यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने देश-विदेशातील विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकविल्या जाईल व दर्जेदार साहित्य भाषांतरित करुन मराठी भाषा व संस्कृतीचा अभ्यास केल्या जाईल,असे विचार व्यक्त केले.
मराठी भाषेचा गुणगौरव ,संवर्धन व साहित्या विषयी आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या १४ ते २८ जानेवारी दरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .त्यात निबंध,स्वरचित काव्य वाचन,वकृत्व, वादविवाद,शुद्धलेखन,कथाकथन,सारांशलेखन अश्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये बहुसंख्य विद्यार्थानीं सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.समीर आलुरवार यांनी केले,आणि आभार प्रा.राहुल बोधे यांनी केले.या कार्यक्रमास बहुसंख्येने विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित राहिल्यामुळे उदंड प्रतिसाद लाभला.हा पंधरवडा यशस्वी करण्यासाठी सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment