मोफत नोंदणी शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी तयार करून घ्यावी — प्रगती सेतू सीएससी केंन्द्र संचालीका मशाखेत्री
मोफत नोंदणी:- शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी तयार करून घ्यावी — प्रगती सेतू सीएससी केंन्द्र संचालीका वैशाली मशाखेत्री
मूल, दीपक देशपांडे .
Farmer ID:शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचविता यावा, याकरिता कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर) योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मूल तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांचे (Farmer ID) फार्मर आयडी तयार करण्यासाठी प्रगती कॉम्यूटर सिएसी केंन्द्र संचालक सौ.वैशाली प्रमोद मशाखेत्री यांनी कळविले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेत उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा, (Farmer ID) किसान क्रेडिट कार्ड, हवामान अंदाज, पीएम किसान योजनेचे अनुदान, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी करत प्रत्येक शेतकऱ्याला एक फार्मर आयडी मिळणार आहे.शेतकऱ्यांना आपला फार्मर आयडी हा स्वतः सेल्फ रजिस्ट्रेशन मोडव्दारे तयार करण्याची ऑनलाईन सुविधा https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या संकेतस्थळावरुन शासनाने उपलब्ध करुन दिलेली आहे. तरी मूल तालुक्यातील सर्व शेतकरी यांनी ॲग्रीस्टॅक या योजनेचा लाभ घेवुन आपले फार्मर आयडी लवकरात लवकर तयार करुन घ्यावेत असे आवाहन केलेले आहे.
सीएससी सेंटरला नोंदणी करता येते ,
या अनुषंगाने तहसील कार्यालय मूल येथे आज सेतू संचालकांचे प्रशिक्षण पार पडले असून आता ही सेवा शेतकऱ्यांना आपले सरकार सेतू सुविधा केंद्रातून मिळू शकणार आहे,हे प्रशिक्षण नायब तहसीलदार नंदकिशोर कुंभारे यांनी यशस्वीपणे पार पाडले.
यांतील आश्चर्यकारक बाब म्हणजे मूल शहरात ७० सेतू सुविधा केंद्र असताना या प्रशिक्षण वर्गात केवळ जवळपास २० केंद्र चालक या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते , याबाबतही प्रशासनाने दखल घेऊन अनुपस्थित केंद्र चालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.व या केंद्रावर अजूनही दरफलक लागलेले नाहीत त्यांना तातडीने ठळक अक्षरात दरफलक लावणे सक्तीचे करण्यात यावे अशी जनतेची मागणी आहे.
मूल शहरातील विश्रामगृह रोडच्या बाजूला प्रगती सेतू आपले सरकार सेवा केंन्द्र सिएससी सेवा केंन्द्र आहे तेथे ही सुविधा सुरू करण्यात आली असून आतापर्यंत जवळपास १० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे ,व ही योजना राबविण्यात येत आहे तरी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे संचालीका वैशाली प्र.मशाखेत्री यांनी कळविले आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments
Post a Comment