वाघाच्या हल्ल्यात, गुराखी ठार!

 वाघाच्या हल्ल्यात, गुराखी ठार!

काल हरवला आज सापडला पण.....शिकार बनूनच!



चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बंडू कोल्हे वय ५५ वर्ष रा. रामपुरी हा इसम बकऱ्या गुरं चारण्या साठी चिचोली च्या जंगलात नेहमी प्रमाणे गेला असता अंदाजे ४. ००वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला केला असावा अशी शंका आहे.. वनविभागाने गावकऱ्यांच्या  मदतीने  शोध मोहीम चालवली होती. रात्री ९.०० वाजे पर्यंत इसम मिळाला नव्हता. अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती,ती सकाळी पुन्हा सुरू करुन शोध घेतला जाणार होता.

आज सकाळी वन विभागाच्या पथकाने पुन्हा शोध मोहीम सुरू केली त्यात काटवण येथील कक्ष क्रमांक ७५६ काटवण नियत क्षेत्रात मृतदेहाचे काही अवयव आढळले त्यापैकी काही उर्वरित अवशेष रुग्णालयात आणण्यात आले यावेळी चंद्रपूर येथील वन उपसंचालक बफर जगताप मॅडम, वनपरिक्षेत्र अधिकारी कारेकर, क्षेत्रपाल वरगंटीवार, वनरक्षक भास्कर परचाके उपस्थित होते.मृतकाच्या कुटुंबीयांना तात्काळ २०,००० रुपये मदत देण्यात आली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागात  वाघ बिबट्या यांचा वावर असून सतत वाघाचे हल्ले  होत असतात त्यामुळे वन विभागाने यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी जनतेची मागणी आहे.  वन विभागाचे याकडे विशेष लक्ष नाही त्यामुळे  गावात नागरिकांमध्ये अत्यंत घबराटीचे वातावरण असून वन विभागाच्या कार्यप्रणाली वर शंका निर्माण झाली असून शासनाच्या विरोधात जनता रोष व्यक्त करीत आहे. वाघाचे हल्ले वाढतच असून मानवाचे प्रिआण जातच आहेत.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.