मूल शहराने अनुभवली एक अभिनव तिरंगा मॅरेथॉन
मूल शहराने अनुभवली एक अभिनव तिरंगा मॅरेथॉन रॅली!
दीपक देशपांडे.
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आज २५जानेवारी रोजी नवभारत कन्या विद्यालय मूल च्या वतीने गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून प्रशासकीय भवन परिसरापर्यंत विद्यार्थिनींची भव्य मॅरेथॉन रॅली आयोजित करण्यात आली होती.
या रॅलीत शाळेच्या बहुसंख्य विद्यार्थीनींनी हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी होत एक वेगळा संदेश देण्याचा व देशभक्ती जागविण्याचा प्रयत्न केला ,नाहीतर आजकाल १५ऑगस्ट व २६जानेवारी म्हणजे केवळ औपचारिकता म्हणून हे राष्ट्रीय सण साजरे होतात, परंतू आज विद्यार्थीनींनी या स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रप्रेम जागविण्याचा प्रयत्न केला, ही बाब अभिनंदनीय अशीच आहे असे मत उपस्थित जनतेतून व्यक्त केले जात होते.
ह्या रॅलीत शिक्षण प्रसारक मंडळ मूल चे अध्यक्ष ॲड.अनिल वैरागडे , सचिव, शशीकांत धर्माधिकारी, मुख्याध्यापिका अल्का वरगंटीवार/कुंदावार ,नायब तहसीलदार नंदकिशोर कुंभारे, ठाणेदार सुमित परतेकी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. देशभक्तीगीत गायनाने कार्यक्रमस्थळी रंगत आणली होती. मुलींच्या रंगीत गणवेश आणि हातातील तिरंग्याने त्यात अजून भर टाकत ही रंगत वाढवली होती.
यानिमित्ताने मूल शहरात एक राष्ट्रीयत्वाची भावना जागविली गेली की नाही माहित नाही एक भावसागर आणि राष्ट्रप्रेम जागविण्याचा प्रयत्न केला गेला हे निश्चित.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment