मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले. मूल, दीपक देशपांडे. मूल येथील अभिनय विभा विठ्ठल बोथले याने एमबीबीएस ची परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण करीत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ.अभिनय ह्याचे १ली ते७वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, त्यानंतर वर्ग ८ते१०वी पर्यंतचे शिक्षण शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय व्याहाड खुर्द येथे झाले. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपलेल्या अभिनयला शिक्षणाची गोडी होती आणि तो अतिशय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होत होता , त्यामुळे एकेकाळी दोन वेळेच्या खाण्याचे वांदे असलेल्या आईने एसटी महामंडळात कशीबशी नौकरी मिळवली आणि दिवस पालटत गेले आणि आजही एसटी महामंडळ मूल येथे कार्यरत आईने नौकरी च्या ठिकाणी मूल येथील नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूल येथे त्याचा अकरावीत प्रवेश घेतला ,कठोर परिश्रम घेत अभिनयने अकरावी बारावी ची परीक्षा सोबतच निटची परीक्षा देत दोन्ही परीक्षा...
Comments
Post a Comment