शिवसेना तालुका मूल तर्फे एस.टी.दरवाढ संदर्भात जाहीर निषेध
शिवसेना तालुका मूल तर्फे एस.टी.दरवाढ संदर्भात जाहीर निषेध
वाहतूक नियंत्रण बस स्थानक मूल यांचे मार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर
✍️मूल, दीपक देशपांडे.
शिवसेना जील्हा प्रमुख मान.संदीप भाऊ गीऱ्हे हयांचे प्रमुख मार्गदर्शन मध्ये आज दि २८/०१/२०२५ रोजी दु.१:०० वाजता बस स्थानक मूल येथे एस.टी. दर वाढ भाडे संदर्भात सरकारच जाहीर निषेध करण्यात आला. तसेच शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत आर गट्टूवार यांचे नेतृत्वात शिस्टमंडळ घेऊन बस स्थानक प्रमुख मूल यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना तालुका संघटक रवी भाऊ शेरकी, शिवसेना शहर प्रमुख बादल करपे,युवासेना शहर प्रमुख अमित ऐलानी,विभाग प्रमुख विनोद चलाख,शाखा प्रमुख मुकेश गांडलेवार, क्षितिज शेडमाके शाखाप्रमुख, क्रिशन शेडमाके उपशाखाप्रमुख,नरेश शेंडे , अतुल आत्राम, सुखदेव सिडाम ,मोजेस आत्राम, ओमदास चलाख ,तथा असंख्य शिवसेना आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्ते मूल बसस्थानक येथे उपस्थित होते.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment