फणस लागवड : शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण

 ग्रामीण कृषि कार्यानुभव   कार्यक्रम (RAWE)  (रावे) विद्यार्थ्यांकडून फणस लागवड : शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण.

दीपक देशपांडे 

कृषि महाविद्यालय, मूल येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यातील कनेरी, इंदाळा, कोटगल, गोगाव, मुरझा व पुलखल या गावांत सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (RAWE)    यशस्वीरीत्या राबविण्यात आला. सदर गावे महाविद्यालयापासून सुमारे ४० ते ५० किलोमीटर अंतरावर असून हा कार्यक्रम ९ जून ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील कृषि कार्यपद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळवणे तसेच गावपातळीवरील कृषि गरजा व समस्यांवर कार्य करणे हा होता.

हा परिसर प्रामुख्याने धान पिकावर आधारित असून हवामान बदल व पर्जन्यमानाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांसमोर विविध अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन रावे (RAWE) विद्यार्थ्यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित मार्गदर्शक शेतकऱ्यांना फणसांची रोपे वितरित करून प्रत्येक विद्यार्थ्याने त्याला नेमून दिलेल्या शेतकऱ्याच्या बांधावर फणसाचे रोप लागवड करून दिली. हे फळपीक हवामान बदलास तोंड देऊ शकणारे व टिकाऊ असल्याने फणस शेतीतून भविष्यात शेतकऱ्यांना पोषण सुरक्षा व अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम मार्गदर्शक शेतकऱ्यांप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून राबविण्यात आला असून या संकल्पनेचे श्रेय डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक (उद्यानविद्या) यांना जाते व संपूर्ण कार्यक्रम डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.   9403285344                                                ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.