मूल येथे भारतीय संविधान सन्मान दिन कार्यक्रमाचे आयोजन
मूल येथे भारतीय संविधान सन्मान दिन कार्यक्रमाचे आयोजन.
दीपक देशपांडे
भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्व तालुका अंतर्गत शहर शाखा वॉर्ड शाखा मूल चे वतीने संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते, केंद्रीय शिक्षक शिक्षिका, बौध्दाचार्य, समता सैनिक दलाचे सैनिक, बौद्ध उपासक उपासिका सर्वांना विनंती करण्यात येते की, दिनांक २६/११/२०२५ ,, बुधवार ला सकाळी ८.०० वा. भारतीय *संविधान सन्मान दिन* हा कार्यक्रम, बोधिसत्व बुद्ध विहार ताडाळा रोड मूल येथे डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व मानवंदना आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व पदाधिकारी केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, समता सैनिक दलाचे सैनिक, बौद्ध उपासक, उपासिका सर्वांनी उपस्थित राहावे.
सर्वांनी शुभ वस्त्र परिधान करून, समता सैनिक दलाच्या सैनिकांनी सैनिकाच्या गणवेशात वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन,भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा मूलच्या वतीने करण्यात आले आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment