स्वर्गीय कन्नमवार पुण्यतिथी निमित्ताने काॅंग्रेसभवनात कार्यक्रमाचे आयोजन .

 स्वर्गीय कन्नमवार पुण्यतिथी निमित्ताने काॅंग्रेसभवनात कार्यक्रमाचे  आयोजन 

मूल : दीपक देशपांडे.

मूल शहरात बेलदार समाजाचे ४५७ घर आणि ३००० च्या वर मतदार असतांना होवु घातलेल्या मूल नगर परीषद निवडणुकीत  काँग्रेस पक्षाने एक नव्हे तीन बेलदार समाज बांधवांना उमेदवारी देवुन समाजाचा सन्मान केला ,मात्र भाजपचे वतीने एकही उमेदवार दिला नाही या बाबीचा बेलदार समाजाने गांभीर्याने विचार केला पाहीजे. असे मत बेलदार समाजाचे जिल्हा संयोजक राजेंद्र कन्नमवार यांनी व्यक्त केले.

    स्थानिक काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या कर्मवीर स्व. मा.सां.कन्नमवार यांच्या पुण्यतिथी निमित्य आयोजित श्रध्दांजली कार्यक्रमात राजेंद्र कन्नमवार बोलत होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तालुका व शहर काँग्रेस पार्टीच्या वतीने स्थानिक काँग्रेस भवन येथे आज स्व. कर्मवीर कन्नमवार यांचा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा स्थानिक काँग्रेस नेतृत्व संतोषसिंह रावत यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात बोलतांना राजेंद्र कन्नमवार यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतांना स्व. मा.सां.कन्नमवार यांनी वर्तमान पत्र घरोघरी वाटप करून देशात मान उंचावली . त्यांनी केलेले कार्ये आणि निर्णायक भुमीका चंद्रपूर जिल्हावासीयांना अविस्मरणीय असुन त्यांनी बेलदार समाजाची राज्यात शान आणि बाण राखली आहे. त्यामूळे त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करणे बेलदार समाजाचीच नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक राजकारण्यांची जबाबदारीही असल्याचे सांगीतले. यावेळी संतोषसिंह रावत यांनी कन्नमवारजींच्या कार्यावर प्रकाश टाकुन श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, तालुकाध्यक्ष गुरु गुरनुले, शहरध्यक्ष सुनील शेरकी, बाजार समिती संचालक तथा बेलदार समाजाचे तालुका अध्यक्ष संदीप कारमवार, व अन्य मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

  1. कै.श्री.मा.सा.उर्फ दादासाहेब कन्नमवार महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री व बेलदार समाजाचे आराध्य दैवत यांच्या पावन स्मृती ला विनम्र अभिवादन.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.