हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत मूल बसस्थानकाचे दूसरे मुल्यांकन

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत मूल बसस्थानकाचे दूसरे मुल्यांकन

  मूल, दीपक देशपांडे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यातील बसस्थानकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत आहे. 

या अभियानात आज ३०जूलै रोजी ‘अ’ वर्गात येणाऱ्या चंद्रपूर विभागातील मूल बसस्थानकाचे सर्वेक्षण करून दूसरे मूल्यांकन करण्यात आले. प्रादेशिक मूल्यांकन समितीमधील छ. संभाजी नगरच्या  प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक २च्या अनघा बारटक्के , अशोक  पन्हाळकर छ. संभाजी नगरचे प्रादेशिक अभियंता क्रमांक २, यांचे समवेत जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष व प्रवासी महासंघाचे अध्यक्ष, दीपक देशपांडे, तसेच दै. लोकमत समाचार चे मूलचे पत्रकार चंद्रकांत मनियार यांच्या चार सदस्यीय समितीने मूलच्या  बसस्थानकाची पाहणी केली. 

या अभियानात 'अ' वर्गातील बसस्थानकाचे चार वेळा मूल्यांकन होणार आहे. 

आज या प्रादेशिक समितीतर्फे मूल बसस्थानकाचे द्वितीय मूल्यांकन करण्यात आले. यानंतर दोन वेळा मूल्यांकन होणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकला एक करोड रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे ,तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकला पन्नास लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, त्यामुळे या स्पर्धेत दिवसेंदिवस अधिकाधिक चुरस निर्माण होऊ घातली आहे.

मूल बसस्थानकाचे मूल्यांकन करताना समितीतर्फे बसस्थानक, परिसरासह पुरुष व महिलांच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, दिशादर्शक सुचनाफलक , बसस्थानकाची रंगरंगोटी, बसस्थानकाचे नाव व फलाटावरील फेरीनिहाय गावाचे फलकांचे निरीक्षण केले. बसस्थानकावरील चौकशी खिडकीच्या बाजूला वेळापत्रक, उद्घोषणा यंत्रणा, प्रवाशांच्या तक्रारी, सूचना संबंधित  बसस्थानकासह आगार व आगार व्यवस्थापकांचे भ्रमणध्वनी क्रमांक, चालक व वाहकांचे विश्रांतीगृह, बसस्थानकावरील चौकशी, आरक्षण सोयीसुविधा, विद्यार्थी व सर्वसामान्य व्यक्तींसाठी मासिक पास खिडकीची सुविधा, रेलिंग, वाणिज्य आस्थापना आणि पार्किंग व्यवस्थेबद्दल सर्वेक्षण करण्यात आले. 

याप्रसंगी चंद्रपूर आगार व्यवस्थापक  अंकुश खाडिलकर व विभागातील अधिकारी , बसस्थानक व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.

यानंतरही दोनदा हे मुल्यांकन होऊन नंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मागच्या काही उणीवा भरुन काढता आपले बसस्थानक अधिकाधिक सोयीसुविधांनी युक्त असावे यासाठी स्थानिक पातळीवर महामंडळाचे कर्मचारी,व जनता यांचे सहकार्य  घेत सुधारणा करण्यात आली असून यानंतरही बऱ्याच  सुधारणा  करण्याची आवश्यकता आहे  त्या किती विचारपूर्वक केल्या जातात  यांवरच या स्पर्धेत मूलचे बसस्थानक टिकेल की नाही हे ठरणार आहे , त्यामुळे बसस्थानक परिसरात प्रवासी , कर्मचारी  यांचेसह प्रत्येकाने आपला सहभाग दर्शविणे आवश्यक आहे ,व आपले बसस्थानक स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️

              9403285344

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.