आज पहिला श्रावणी सोमवार .

      आज पहिला श्रावणी सोमवार

      ‼ *ॐ नमः शिवाय* ‼

      *सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।*

        *उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम् ॥१॥*

        *परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् ।*

        *सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥*

        *वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे ।*

        *हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये ॥३॥*

        *एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः ।*

        *सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥*

        *...... शिवस्तोत्र*

       *सनातन भारतीय संस्कृतीची साक्ष.. शिवाच्या बारा ज्योर्तिलिंगाची ही नावे असलेला हा श्लोक.*

        *भक्तांचे दैवत म्हणजे भगवान भोलेनाथ. चातुर्मासातील हा श्रावण महिना शिव उपासनेचा. शिवाला प्रत्येक स्थानावर वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.*

        *शिवाच्या आराधनेची पद्धत आहे. आज शिवस्तोत्राचे.. शिवमहिमा स्तोत्र.. शिवलीलामृताचे पठन करायचे. आम्हाला जे त्यानेच दिले ते अंशतः त्याला अर्पण करायचे. जलाभिषेक.. दुग्धाभिषेक.. बेल.. फुले वाहायची. आज बेल पानाचे महत्त्व पूजनात सांगितल्यामुळे देशभर या आयुर्वेदीय वृक्षाचे संगोपन हजारो वर्षे होत आहे.*  

        *शिव म्हणजे कल्याण. हा कल्याणाचा मार्ग नेहमीच कठीण चढणीचा.. काटेरी. यामुळेच श्रीशंकर हे कैलासावर राहतात. कल्याणाची वाट सदैव अवघड असली तरीही ही वाट चालायला त्याचे आशीर्वाद मागायचे.*

        *आज भोलेनाथाची ज्ञानरुपी साधना करुन स्वतःचे कल्याण करुन घ्यायचे. हे त्रिलोचन आमचा लोभ.. मोह.. अहंकार नष्ट करतील.*

        *ज्याच्या मस्तकी ज्ञान गंगा आहे.. जो उत्तुंग धवल शिखरावर राहतो, साधेपणा हाच ज्याचा शृंगार आहे.. विभूतीला जो वैभव मानतो.. सज्जनांना वाचवायला ज्याने विष प्राशन केले अशा या दुर्जनांच्या संहारकाचे.. निळकंठाचे पूजन मनोभावे आज होणार.*

        *आज गावोगाव भक्त उपवास करणार. नजिकच्या पवित्र नदीचे जल भोलेनाथाचे नामस्मरण करत पायी चालत जात कावडीने आणून शिवाला जलाभिषेक करणार. गावालगतच्या सगळ्याच नद्यांना पवित्र गंगेचा मान आहे. हे जल कावडीने आणणे कष्टप्रद असले तरीही अशाप्रकारे शिव पूजन करण्याचा भक्तांना आगळाच आनंद मिळतो.*

        *किती महिमा गावा या शंकराच्या रुपाचा.. गुणाचा.. त्याचे अस्तित्व हे अत्र तत्र सर्वत्र आहे. आमच्याकडे ते सतत डोळे उघडे ठेवून बघतात, याचे भान प्रत्येक कृतीवेळी आहे. ते लोभ.. मोहापासून कसे दूर रहावे याचा आदर्श आपल्या वैराग्यवृत्तीने ठेवतात. शिवाने राहायचे ठिकाण निवडलेय ते उंच असा कैलास पर्वत. त्यांना अंगाला चिताभस्म पूरेसे.* 

        *या सर्वशक्तीमान पण तरीही निर्मोही देवाचे आमच्यावर अहोरात्र लक्ष आहे ही जाणीवही मानवाला कल्याणकारी. त्यांना प्रसन्न करण्यासाठी म्हणून हा मंत्र "ॐ नमः शिवाय"*


   *! कैलासराणा शिवचंद्रमौळी !*

   *! फणींद्रमाथां मुकुटी झळाळी !*

    *! कारुण्यसिंधु भवदुःखहारी !*

  *! तुजविण शंभो मज कोण तारी !*

 *‼श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ‼*

                *२८.०७.२०२५

        संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.