मोठी बातमी. वाघाचा हल्ला! पुन्हा एकदा गुराखी जखमी.
मोठी बातमी.
वाघाचा हल्ला! पुन्हा एकदा गुराखी जखमी.
दीपक देशपांडे
मूल तालुक्यातील वेगवेगळ्या गावात वाघाच्या हल्यात गुराखी आणि शेतकरी शिकार वा जखमी झाल्याच्या बातम्या अर्धा पावसाळा संपत आला तरी काही संपता संपत नाही.
काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात जंगलात पाण्याची कमतरता असते त्यामुळे व जंगलात वन्य प्राण्यांना शिकार मिळवणे दुरापास्त झाल्याने ते गावांकडे धाव घेत असल्याचे शासकीय पातळीवरून बोलले जात होते मात्र सध्या वर्तमानात बाराही महिने शेतकरी व गुराख्यांना जंगलातच नव्हे तर आपल्या शेतशिवारात सुद्धा भयभीत होऊन वावरावे लागते,व आपल्या जीवाची बाजी लावून शेतात जावे लागत आहे.
अशाही स्थितीत भरदिवसा वाघाच्या हल्यात गुराखी आणि शेतकरी सापडतच असून त्याचाच एक भाग म्हणून आज मूल तालुक्यातील परशुराम मडावी राह.काटवन वय ६० वर्षे या इसमावर गाई ढोरं चारतांना आज दुपारी ३-४० ते ४वा.दरम्यान मौजा,काटवन च्या जंगलात वाघाने हल्ला चढविला , या हल्ल्यात तो जखमी झाला असून मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.
पुढील चौकशी सुरू आहे.
जनता भयभीत असून एका नवीन उद्रेकाची ठिणगी पडू नये यासाठी शासनाने तातडीने कारवाई करुन थातुरमातुर वेळकाढूपणा न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची परिसरातील जनता मागणी करीत आहेत.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️
9403285344

Comments
Post a Comment