प्रकृती सांभाळण्यासाठी पत्रकारांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे - बनवारीलाल पुरोहित यांचे प्रतिपादन

 पत्रकारांच्या आरोग्याकरिता नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सचा पुढाकार, डॉ. पिनाक दंदे यांच्याकडे 'आरोग्य मेंटॉर'चे दायित्व

प्रकृती सांभाळण्यासाठी पत्रकारांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे - बनवारीलाल पुरोहित यांचे प्रतिपादन

नागपूर, दि. १५ दीपक देशपांडे.

पत्रकारांचे आयुष्य कायम धावपळीचे आणि दगदगीचे असते. सर्वच बाबतीत अनिश्चिततेला तोंड देत त्यांना काम करावे लागते. अशावेळी त्यांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेऊन योग्य ते उपचार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल आणि भारतीय विद्या भवनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष  ज्येष्ठ संपादक-पत्रकार बनवारीलाल पुरोहित यांनी केले. 

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, विदर्भ प्रांत, डॉ. दंदे फाउंडेशन आणि भानूताई गडकरी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवाजीनगर येथील शिवाजी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ख्यातनाम उद्योजक निखिल मुंडले, नगरसेविका धनश्री देशपांडे, डॉ. दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख आणि नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, विदर्भ प्रांताचे अध्यक्ष अविनाश पाठक व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्यूअर हे तत्व सांगून बनवारीलालजी म्हणाले, पत्रकारांना अनेकदा वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रकृतीच्या समस्या आल्या तर अनेकदा पत्रकारांना खर्चाची तोंडमिळवणी करणे कठीण जाते. अशावेळी त्यांना मदतीला जर डॉक्टर मंडळी समोर आली तर त्यांच्या समस्यांचे निराकरण सहज होऊ शकते. त्यामुळे डॉ. दंदे यांचे मनापासून अभिनंदन करीत दंदे फाउंडेशनने दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा आणि अधिक सक्षमपणे पत्रकारिता करावी, असे आवाहन पुरोहित यांनी यावेळी केले. पत्रकारांनी गरजेपेक्षा कमी जेवावे, मात्र दुप्पट चालावे, तसेच तिप्पट हसावे आणि सर्वांवर दिलखुलास अमर्याद प्रेम करावे, तर सर्वांची प्रकृती निश्चित चांगली राहील असा हितोपदेशही त्यांनी केला

यावेळी बोलताना डॉ. दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे म्हणाले की आपण वैद्यकीय व्यवसाय करत असताना पत्रकारांशी विविध कारणांनी संबंध आला. चर्चेतून अनेकांच्या समस्यांची कल्पना आली. त्यावेळी अशा पत्रकारांना एकत्रितपणे त्यांच्यावर उपचार करून त्यांना नियमित सेवा देता येतील, असा प्रयत्न करावा असे वाटले. त्यातूनच ही संकल्पना पुढे आहे, असे सांगून डॉ. दंदे म्हणाले की या शिबिरानंतर या संघटनेमार्फत येणाऱ्या पत्रकारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची आपण पूर्ण तपासणी करून त्यांना नियमित स्तरावर आरोग्य विषयक मार्गदर्शन करू. सवलतीच्या दरात आरोग्य सेवा कशा उपलब्ध होतील याबाबतही त्यांना मदत करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवला जावा आणि तो योग्य पद्धतीने उतरवलेला असावा यासाठी देखील आपण मार्गदर्शन करू असेही त्यांनी सांगितले. यावेळी निखिल मुंडले आणि धनश्री देशपांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

प्रारंभी प्रास्ताविकात नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स विदर्भचे अध्यक्ष अविनाश पाठक यांनी या शिबिरामागची नेमकी संकल्पना काय हे विशद करत डॉ. पिनाक दंदे यांनी सहकार्याचा हात दिला याचा विशेष उल्लेख केला. नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्सच्या विविध कार्यक्रमांची त्यांनी माहिती दिली. 

या आरोग्य शिबिरात डॉ. सीमा दंदे, डॉ. अनुभा दंदे यांनी महिला आरोग्य विभागात, तर डॉ. सुशांत मुळे यांनी जनरल फिजिशियन विभागात प्रत्यक्षपणाने रुग्ण चिकित्सा केली. भानुताई गडकरी ट्रस्टच्यावतीने डॉ. श्रीरंग वराडपांडे यांच्या नेतृत्वात नेत्र आणि कर्ण चिकित्सेकरिता नितीन कुळकर्णी आणि विलास सपकाळ यांनी तपासणी व्यवस्था सांभाळली. डॉ. सुरेंद्र शनिसारे आणि डॉ. तारेंद्र कटरे यांनी ईसीजी विभाग सांभाळला. आशा सरदार, गीता माने यांच्या मार्गदर्शनात अपेक्षा रामटेके, दिप्ती तिमोथी आणि शेखर गौरखेडे यांनी आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेकरिता प्रयत्न केले. शासकिय दंत महाविद्यालयाच्या चमुने दंत चिकित्सा विभाग सांभाळला. भानुताई गडकरी ट्रस्टच्यावतीने यावेळी अत्यल्पदरात डोळे तपासून नंबर मिळालेल्या शिबिरार्थ्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात  आले. 

यशस्वीतेसाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्सचे  पराग जोशी, उदय अंधारे, स्नेहल जोशी, राघवेंद्र टोकेकर, चारुदत्त कहु, सुरेश विंचुरकर, गौरी शास्त्री देशपांडे प्रभृतींनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला जेष्ठ पत्रकार मोरेश्वर बडगे, सोपान पांढरीपांडे, महेश उपदेव, प्रभृती आवर्जून उपस्थित होते. आरोग्य शिबिरात शंभरावर पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.