लोकवर्गणीतून बेंबाळ येथे दीपोत्सव महोत्सव उत्साहात; गरजू कुटुंबांचीही साजरी झाली दिवाळी!
लोकवर्गणीतून बेंबाळ येथे दीपोत्सव महोत्सव उत्साहात; गरजू कुटुंबांचीही साजरी झाली दिवाळी!
बेंबाळ, मूल : दीपक देशपांडे.
ग्रामपंचायत कार्यालय बेंबाळच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 'एक दिवा आपुलकीचा, एक दिवा आपल्या गावाचा' या संकल्पनेवर आधारित दीपोत्सव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दिवाळी हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, उत्साह आणि प्रकाश घेऊन येतो. मात्र गावातील कोणतेही गरजू कुटुंब दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहू नये, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लोकवर्गणी जमा करून गावातील गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ व वस्त्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचा दीप प्रज्वलित झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच चांगदेव केमेकार, ग्रामपंचायत सदस्य राकेश दहिकर, आशाताई मडावी, आशाताई शेंडे, अरुणाताई गेडाम, प्रतिभाताई भडके तसेच ग्राम पंचायत कर्मचारी तुषार वनकर, गोविंदा कोम्मावार,यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशांत उराडे, दिपक वाढई, प्रविण वाळके सर,अजित येरोजवार, माणिक भडके, प्रकाश पंधरे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
दीपोत्सवाच्या माध्यमातून गावातील नागरिकांमध्ये एकोपा, सामाजिक सलोखा, आपुलकी आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. सण-उत्सव केवळ स्वतःच्या आनंदासाठी नसून समाजातील वंचित व गरजू घटकांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी असतात, हा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे गावातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, 'आपला आनंद इतरांसोबत वाटून घेण्यातच खरा सण साजरा होतो' याची प्रचिती या दीपोत्सव महोत्सवातून आली.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment