झाडाझडती ✍️विनोद देशमुख मोदींचा बाप आठवला ! स्वत:ची आई का नाही ?

 झाडाझडती ✍️विनोद देशमुख

मोदींचा बाप आठवला !

स्वत:ची आई का नाही ?

आपले राजकीय नेते कृतिवीर कमी अन् वाचाळवीर जास्त होत चालले असल्याचं सध्या प्रकर्षानं जाणवत आहे. यात हा पक्ष की तो पक्ष, हा प्रश्न नाही. सर्वच पक्षांमधील नेत्यांची जीभ घसरण्यासाठी सारखी वळवळत असते, असाच अनुभव लोकांना वारंवार येत आहे. विरोधकांवर टीका करताना किमान भाषा तरी जपली पाहिजे, याचं भान नेत्यांनी ठेवणं अपेक्षित आहे. त्यातही, जास्त पावसाळे पाहणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांवरची जबाबदारी मोठी आहे. पण जेव्हा ज्येष्ठ मंडळीच वाटेल तसं बोलून जातात, तेव्हा नव्या पिढीला काय म्हणणार ? युवा नेत्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा ? अन् मग हा वाह्यातपणा खालपर्यंत झिरपत जाऊन वातावरण नासत जातं. नव्हे, आज ते पूर्णत: नासलेलंच आहे.

याचं ताजं उदाहरण पाहा. सध्याच्या राष्ट्रीय राजकारणातील सर्वात ज्येष्ठ नेते (वय वर्षे 84), अर्धशतकापेक्षा जास्त काळ आमदार-खासदार-मंत्री राहिलेले, सध्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड्. मापन्ना मल्लिकार्जुन खडगे परवा असंच काहीतरी बोलून गेले. पाटण्याच्या सभेत त्यांनी पंतप्रधानांचा बापच काढला ! त्यांचं भाषण सुरू असताना प्रेक्षकांमधून कोणीतरी, 

"मोदी सहजासहजी हटणार नाही" 

अशा अर्थाचं वाक्य उच्चारलं. ते ऐकून खडगे बावाजीचा तोलच ढळला ! अन् ते ओरडले- "मोदी क्या, मोदीका बाप भी जाएगा। मोदीका बाप..."

आपल्याच सभेतील कार्यकर्ता एकप्रकारे मोदींची बाजू घेत असल्याचं पाहून संताप आल्यानं ते असं बोलले असावेत. (नंतर या माणसाला लोकांनी झोडपून सभेबाहेर हाकललं !) वयोमानपरत्वे खडगेंची जीभ घसरली असावी, असंही कुणाला वाटू शकतं. परंतु, त्यांचा इतिहास पाहता, हा अंदाज चुकतो. मोदी, भाजपा, संघ यांच्याबद्दल खडगेंच्या मनात ठासून द्वेष भरलेला आहे, हे अनेकदा दिसून आलं आहे. विशेषत: २०२२ मध्ये कॉंग्रेसाध्यक्ष झाल्यापासून तर ते नुसते बोलत सुटलेले दिसतात. त्याची ही काही तारीखवार उदाहरणं-

२९ नोव्हेंबर २०२२ : अहमदाबाद येथील सभेत मोदींना 'रावण' म्हटलं

२७ एप्रिल २०२३ : कर्नाटकाच्या कलबुर्गीत मोदींचा उल्लेख 'विषारी साप'

२१ एप्रिल २०२६ : चेन्नईत "मोदी आतंकवादी है"

इतके शिव्याशाप देऊनही मोदींचा एकही 'बाल बांका' होत नाही, असं पाहून खडगे आता त्यांच्या वडिलांवर आले की काय, माहीत नाही. पण, या विधानाचा समाचार घेणाऱ्यांनी ते त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न समूह माध्यमांवर केलेला जाणवतो. एक जण म्हणाला- "खडगेंना शेवटी मोदीजींचा बाप आठवलाच !" दुसऱ्यानं विचारलं- "त्यांना स्वत:ची आई का आठवत नाही ?" मयंक नाथ नावाचे मीडिया इन्फ्लुएन्सर लिहितात-

"जो धरती पर आया है, उसका जाना भी निश्चित है। मोदी का बाप भी गया था और खडगे की मां भी। फर्क सिर्फ इतना है कि मोदी का बाप अपनी पूरी जिंदगी जीकर 74 वर्ष की उम्र में गया था। जबकि खडगे की मां को 26 वर्ष की उम्र में रझाकार मुसलमानों ने जिंदा जला दिया था। खडगे का बाप अपनी पत्नी की निर्मम हत्या का बदला लेने के बजाय गांव छोडकर भाग गया था। कुछ समय बाद उसने दूसरी शादी कर ली और खडगे को नई मां लाकर दी !"

काय राहिली खडगेंची ? तुम्ही मोदींचा बाप काढला, तर कोणीतरी तुमच्या बापासोबत आईही काढली. निझाम स्टेट मधील रझाकारांच्या अत्याचारात आई आणि बहीण गमवावी लागण्याचा दु:खद प्रसंग खडगेंवर बालपणीच ओढवला, तेव्हा ते अवघे 6-7 वर्षांचे होते. त्या दोघींना रझाकारांनी जिवंत जाळले. हे मरण हैदराबाद मुक्ती संग्राम या स्वातंत्र्य लढ्यातील होतं. पण, त्याचा अभिमानानं उल्लेख करणं खडगेंच्या राजकारणासाठी सोयीचं नाही, उलट अडचणीचंच आहे ! हे हेरूनच वरील पलटवार करण्यात आला, हे उघड आहे. यात खडगेंचीच फजिती होत आहे ना. क्षुद्र राजकारणासाठी वाटृेल तसं बोलून-वागून काही लोक स्वत:ची ऐसीतैसी का करून घेतात, हेच समजत नाही. खडगेंसारख्या ज्येष्ठतम नेत्यानं आणि सर्वच पक्षांमधील नेत्यांनी अशा उटपटांग गोष्टी टाळल्या पाहिजे, अशी अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे काय ?

✍️ विनोद देशमुख, नागपूर ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.