माझंही मत... भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी संघ परिवाराने "हे" करावे...
माझंही मत...
भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी संघ परिवाराने "हे" करावे...

भारत हे मुळातच हिंदू राष्ट्र आहे. त्याला हिंदू राष्ट्र म्हणून वेगळे घोषित करण्याची काहीही गरज नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले आहे. त्यांचे हे विधान निश्चितच स्वागतार्ह मानावे लागेल.
भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे जरी डॉ. मोहन भागवत मान्य करत असले, तरी सरकार दरबारी असलेल्या नोंदणीनुसार मात्र हे हिंदू राष्ट्र नाही. जगात माझ्या माहितीप्रमाणे ५० च्या वर मुस्लिम राष्ट्रे आहेत. कदाचित तितकीच किंवा जास्तही ख्रिस्ती राष्ट्रे आहेत. काही बौद्ध धम्मियांची देखील राष्ट्रे आहेत. मात्र हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म मानला गेलेला असतानाही एकही हिंदू राष्ट्र नाही हे दुर्दैवी वास्तव नाकारता येत नाही. काही वर्षांपूर्वी पर्यंत नेपाळ हे हिंदू राष्ट्र होते. मात्र मधल्या काळात तिथे डाव्यांची सत्ता आली आणि त्यांनी देखील निधर्मिक भूमिका घेतली.
पुरातन काळापासून भारतात हिंदू हेच कायम वास्तव्य करून होते. त्यावेळी हा देश अगदी थेट काबुल कंदाहार पर्यंत, इकडे खाली श्रीलंकेपर्यंत, तिकडे म्यानमार पर्यंत असा विस्तीर्ण पसरलेला होता. इथे आज जसा हा सलग देश आहे तसा सलग देश जरी नसला तरी छोटी छोटी हिंदू राजांचीच राज्ये होती.
नंतरच्या काळात भगवान गौतम बुद्धाने अवतार घेतला. त्याने बौद्ध धम्म स्थापन केला. परिणामी काही हिंदू हे बौद्ध झाले. मग नंतर जैन धर्म आला.
त्यामुळे काही हिंदू हे जैन धर्म स्वीकारते झाले. नंतर आक्रमणकारी म्हणून मुस्लिम या देशात आले. त्यांनी हा देश तर ताब्यात घेतलाच, पण त्याचबरोबर तलवारीच्या जोरावर इथल्या असंख्य हिंदूंना बाटवून मुस्लिम केले. आज या देशात निवासाला असलेल्या बहुसंख्य मुस्लिमांचे जर तुम्ही मूळ शोधायला गेलात, तर साधारणपणे दहाव्या शतकाच्या आधी हे सर्व हिंदूच असल्याचे पुरावे सापडू शकतात.
साधारणपणे तेराव्या चौदाव्या शतकात व्यापार करण्यासाठी म्हणून ख्रिस्ती बांधव इथे आले. त्यांनी सोबत काही धर्मप्रचारक देखील आणले होते. या धर्मप्रचारकांनी इथल्या गोरगरिबांना भूलथापा देऊन त्यांना ख्रिस्ती बनवले. मग हळूहळू त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही घोळात घेत या देशावर आपली सत्ता प्रस्थापित केली. आज या देशातील ख्रिस्ती बांधवांचे मूळ शोधले तर ते सर्व पूर्वीचे हिंदूच आहेत असे दिसून येते.
आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्ष लोटली. तरीही या देशात हिंदूच बहुसंख्येने आहेत हे जनगणनेच्या माध्यमातून आढळून येईल यात शंका नाही. तरीही मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधवांनी विविध पद्धतीने इथे आपली लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे सरकार सत्तेत आले ते मुस्लिम आणि ख्रिस्तींचे लांगूलचलन करणारे होते. त्यामुळे मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधवांना अकारण सवलती तर दिल्याच, पण हा देश हिंदूंचा न ठेवता इथे निधार्मिकता त्यांनी स्वीकारली. त्यामुळे मूळचा हिंदूंचा असलेला हा देश हिंदूंचा कधीच म्हणवला गेला नाही. देशाची संविधान जेव्हा लिहिले गेले तेव्हा त्याच्या प्रास्ताविकेत निधर्मिकता हा शब्द नव्हता. मात्र आणीबाणीत इंदिरा गांधींनी विरोधी पक्ष तुरुंगात डांबला आणि त्याच वेळी त्यांनी घटना दुरुस्ती करून निधर्मिकता हा शब्द प्रास्ताविकेत अक्षरशः घुसडला. इथे मुस्लिम आणि ख्रिस्ती अल्पसंख्यांक ठरवले गेले, आणि त्यांना वारेमाप सवलती दिल्या गेल्या. देशात एक पत्नीत्वाचा कायदा आहे. कुटुंब नियोजनाचा कायदा आहे. मात्र त्यातून मुस्लिमांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुस्लिमांची लोकसंख्या वाढतेच आहे. जर असेच राहिले तर २०५० नंतर या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के पर्यंत मुस्लिम पोहोचतील आणि मग ते भारत देखील मुस्लिम राष्ट्र म्हणूनच घोषित करण्याची मागणी करतील.
आज मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधव ज्या आक्रमकपणे आपल्या धर्माचा प्रचार करतात आणि हिंदूंना धर्म परिवर्तन करायला लावतात, त्या आक्रमकपणे हिंदू समाज आपल्याच बांधवांची घरवापसी करून घेण्यात अपुरा पडतो आहे. त्यामुळेच हिंदूंची संख्या कमी होते आहे आणि मुस्लिमांची संख्या वाढते आहे. मात्र हा मुद्दा फारसा कोणी लक्षात घेत नाही.
त्यामुळेच डॉ. मोहन भागवत म्हणतात त्याप्रमाणे हे मुळातच हिंदू राष्ट्र आहे, हे मान्य. मात्र सरकार दरबारी सुद्धा हे हिंदू राष्ट्र म्हणूनच मान्य केले जावे यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना देखील मोहन भागवत आणि त्यांच्या संघटनेने खुलेआम पाठिंबा द्यायला हवा. त्याचप्रमाणे हिंदूंना संघटित करण्याचे काम संघ करतोच आहे. मात्र आक्रमकपणे जे असे पाठवले गेलेले हिंदू आहेत, त्यांना मूळ धर्मात आणण्यासाठी, त्यांची घरवापसी करण्यासाठी संघ परिवाराने आक्रमकपणे काम करायला हवे.
याचा अर्थ संघपरिवार काहीच करत नाही असा नाही. मात्र जे व्हायला हवे ते अधिक आक्रमकपणे केले जावे. या देशात एकूण लोकसंख्येच्या किमान ८० टक्के तरी स्वतःला हिंदू म्हणणारे हिंदू बांधव पुढे येतील आणि भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, त्या दृष्टीने सरकारने अधिकृत घोषणा करावी आणि अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन न करता देशात समान नागरी कायदा आणावा यासाठी सरकारवर दबाव आणतील तरच भारत खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्र म्हणवल जाऊ शकेल.
अर्थात हे माझं मत झालं.......
तुमचं मतही तुम्ही मोकळेपणे मांडू शकता..
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment