कृषी महाविद्यालय मूल येथे स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा ५०० वा टप्पा उत्साहात साजरा
कृषी महाविद्यालय मूल येथे स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा ५०० वा टप्पा उत्साहात साजरा.
डीडीबातमी वृत्तसेवा.
कृषि महाविद्यालय मूलच्या वतीने आयोजित ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा ५०० वा टप्पा उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ विलास अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली, श्री. चंद्रशेखर गलगलीकर, आर्ट ऑफ लिव्हिंग, वरिष्ठ प्रशिक्षक व समाजसेवक ,डॉ. जयश्री गलगलीकर, आर्ट ऑफ लिव्हिंग, वरिष्ठ प्रशिक्षक नागपूर,श्री. दीपक देशपांडे अध्यक्ष, जागृत ग्राहक राजा, नागपूर विदर्भ प्रांत, प्रा. चंद्रकांत मणियार, वरिष्ठ पत्रकार, मूल ,श्री. विनोद इंगोले वरिष्ठ विदर्भ प्रतिनिधी, ॲग्रोवन ,श्री. सोहम बुटले, अध्यक्ष युवा वॉरियर्स चंद्रपूर, यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथींचे स्वागत शाल, श्रीफळ व तुळशीवृंदावन देऊन करण्यात आले आणि वृक्षलागवड व जतन करण्याचा मुलमंत्र अतिथींच्या स्वागत समारंभातूनच दाखविला गेला.
या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. चंद्रकांत मणियार, वरिष्ठ पत्रकार, मूल यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत त्यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. श्री. दीपक देशपांडे अध्यक्ष, जागृत ग्राहक राजा, नागपूर विदर्भ प्रांत, यांनी मोहिमेला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हिताचे जतन करावे, त्यासाठी स्वच्छतेचा जागर करावा आणि वर्षेभरापूर्वीचा महाविद्यालय परिसर आणि आजचा परिसर यांत प्रचंड सुधारणा करण्यात आल्याचे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा जाणवते इतका आमुलाग्र बदल झाला आहे असेही स्पष्ट केले. श्री. विनोद इंगोले वरिष्ठ विदर्भ प्रतिनिधी, ॲग्रोवन यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे कौतुक करून पुढेही अशीच कार्यप्रवृत्ती कायम ठेवण्याच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. जयश्री गलगलीकर, आर्ट ऑफ लिव्हिंग, वरिष्ठ प्रशिक्षक नागपूर यांनी पर्यावरणातील वाढत्या कचऱ्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती देत ‘स्वच्छता हीच सेवा’ हे मूल्य अंगीकारण्याचे आवाहन केले. श्री. चंद्रशेखर गलगलीकर, आर्ट ऑफ लिव्हिंग, वरिष्ठ प्रशिक्षक व समाजसेवक यांनी सेवेचे महत्त्व अधोरेखित करत कविता सादर केली व विद्यार्थ्यांना सेवेमार्फत जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास प्रेरित केले.
श्री. सोहम बुटले, अध्यक्ष युवा वॉरियर्स चंद्रपूर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ. विजय अतकरे यांच्या आदर्शाचे अनुकरण करून स्वच्छतेचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय अतकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मे २०१७ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा प्रवास सांगत ५०० वा टप्पा गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली व हा उपक्रम पुढेही सातत्याने चालू ठेवण्याचे आवाहन केले. वृक्षारोपणाविषयी बोलताना त्यांनी फणसाचे झाड ‘कल्पवृक्ष’ असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या घरी, शेतात व नातेवाईकांकडे त्याची लागवड करावी, असे आवाहन केले. तसेच आजपर्यंत सहकार्य केलेल्या सर्व विद्यार्थी व अधिकारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आशिष लाडे (सहाय्यक प्राध्यापक व कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना) करताना राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान मा. सहयोगी अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असल्याचे सांगितले. डॉ. रमाकांत गजभिये, प्राध्यापक (उद्यानविद्या) यांनी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर फणसाच्या रोपांची लागवड तंत्रज्ञान व त्यांचे फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली.
सूत्रसंचालन डॉ. गीतांशू डिंकवार, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. नागेश नवघरे, सहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रांगणात स्वच्छता अभियान राबविण्यात आले व
महाविद्यालयाचे सोमनाथ येथील प्रक्षेत्रावर आजवर पडिक असलेल्या जमिनीची मशागत करून सुमारे ७० फणसाच्या रोपांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️


Comments
Post a Comment