आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर गोंडवाना आदिवासी आंदोलन चळवळ आणि भाजपाची सत्ता स्थापन
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर गोंडवाना आदिवासी आंदोलन चळवळ आणि भाजपाची सत्ता स्थापन.
पोंभुर्णा डीडीबातमी वृत्तसेवा.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित पोंभुर्णा येथील संस्थेवर पहिल्यांदाच गोंडवाना आदिवासी आंदोलन चळवळ आणि भाजपाची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. या घडामोडींमुळे तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे. अनेक वर्षांनंतर सत्ता बदल झाले आहे.
दिनांक २२ एप्रिल रोज बुधवारला दुपारी १२ वाजता सहायक निबंधक पोंभुर्णा यांच्या कार्यालयात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष म्हणून राजेंद्र कुळमेथे तर उपाध्यक्षपदी बालाजी पेंदोर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी संचालक ईश्वर नैताम, दिलीप मॅकलवार, श्रीकांत वडस्कर, निमचंद्र कोवे,विस्तारी टेकाम आणि चतुर ऊईके तसेच ईतर संचालक उपस्थित होते.
निवडणूक अत्यंत चुरशी असुन सुद्धा शांततेत पार पडली.
नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सर्व संचालक मंडळाचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, गोंडवाना आदिवासी आंदोलन चळवळीचे जगण येलके महाराज,भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, तालुका अध्यक्ष हरिष ढवस, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरिवार, माजी जि.प.सदस्य राहुल संतोषवार, नंदकिशोर तुम्मुलवार,माजी जि.प.अध्यक्ष संतोष कुभंरे, शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे , अजय लोणारे तसेच विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment