मूल तालुक्यातील गुणवंत...विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथील नंदिनी देऊलवार.

मूल तालुक्यातील गुणवंत...

 विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथील नंदिनी देऊलवार 

 एन.एम.एम.एस. परीक्षेत उत्तुंग भरारी

NT-C प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम 

मूल :-दीपक देशपांडे.

महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (NMMS) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला .यामध्ये मूल तालुक्यातील विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथील विद्यार्थिनी नंदिनी शंकर देउलवार हिने घवघवीत यश संपादन केले.नंदिनीने चंद्रपूर जिल्ह्यातून जनरल प्रवर्गातून पाचवे मेरिट स्थान पटकाविले असून NT-C प्रवर्गातून ती जिल्ह्यातून पहिली आली आहे. नंदिनी ही मूळची जुनासुर्ला  येथील असून तिने इयत्ता आठवीमध्ये असताना ही परीक्षा दिली होती.एकूण १८० गुणांच्या या परीक्षेत तिने १२४ गुण मिळवून गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले.या यशामुळे तिला आता इयत्ता ९ ते १२ वी पर्यंत पुढील ४ वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.ग्रामिण भागात राहून व गरिबीचे चटके सोसून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तिने हे यश खेचून आणले आहे.नंदिनीच्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक के.सी. कामडी, शाळेचे शिक्षक वृद व कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती यांनी तिचे व तिच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षक नागेश संदमेनवार यांचे  विशेष अभिनंदन केले आहे . तिच्या या यशामुळे विवेकानंद विद्यालय बेंबाळ च्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.

पुन्हा एकदा ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक सोयीसुविधांचा अभाव असतांनाही स्वमेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपली गुणवत्ता सिद्ध करतांना दिसतात ही आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे दिसून येते.

जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे आणि जागृत ग्राहक राजा मूल तालुका शाखा मूल चे पदाधिकारी यांनी नंदिनी चे  व शाळेचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.