मूल शहरातील राजकीय वर्चस्व नाकारीत प्रशासनाची अतिक्रमण हटविण्याची कारवाई .

 मूल शहरातील राजकीय वर्चस्व नाकारीत प्रशासनाची अतिक्रमण हटविण्याची कारवाई 

दीपक देशपांडे.

मूल शहरातील गांधी चौक येथे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर काँग्रेसचे नेते संतोष रावत यांनी अवैध बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडला.

मूल येथील अत्यंत मोक्याच्या गांधी चौकातील जागा बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच भाजपाचे शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले आणि नगरसेविका प्राची आक्केवार यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली.

तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेने संतोष रावत यांना नोटीस बजावून काम तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याने अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने कडक पावले उचलली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने संबंधित अतिक्रमण हटविण्यात आले.

या कारवाईमुळे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यात यश आले असून, राजकीय प्रभावाचा वापर करून बेकायदेशीर कामे करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात पुढाकार घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल भाजपाचे शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले व नगरसेविका प्राची आक्केवार यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे ,असे प्रविण मोहुर्ले यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रशासनाने अशाच पद्धतीने गाव खेड्यातील पानंद रस्ते व शिवरस्ते अडवून ठेवणाऱ्यांच्या विरोधात मोहीम राबविण्याची मागणी गाव खेड्यातील जनतेने केली आहे ,कारण या गावखेड्यातील बहुतेक रस्ते हे अशाच राजकीय वरदहस्त लाभलेल्या किंवा सक्रिय राजकारण्यांनीच अडवून ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे. या मागणीकडे प्रशासन कसे लक्ष देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.