नवरात्रिचा आध्यात्मिक अर्थ.
🪔नवरात्रिचा आध्यात्मिक अर्थ🪔

नमस्कार मंडळी, सगळीकडे नवरात्रीच्या उत्सवात आपण सगळे मश्गूल असतांनाच कधीकधी आपल्याला हा पर्वकाळ कां पाळायचा?त्यांचे महत्त्व काय? याबाबत माहिती नसते,ती माहिती आमच्या नित्य वाचक , चाहत्यांसाठी घेऊन आल्या आहेत आमच्या चाहत्या आणि नित्य वाचक ,सहकारी.......वर्षा मदनकर, चंद्रपूर.
आम्ही नेहमीच नवलेखकांना /नवलेखिका आणि कवी यांना संधी देण्याचा प्रयत्न करीतच असतो तोच हा एक प्रयत्न. लेखिकेच्या मताशी संपादक सहमत असतीलच असे नाही,मात्र त्यांच्या आग्रहास्तव एक संधी देत आहोत. बघा, आपल्याला त्यांचे मत पटतंय का?
दीपक देशपांडे, मुख्य संपादक.
सर्वत्र नवरात्रिची धामधूम आहे. गरबा, जागरण, उपवास, इत्यादीमध्ये सगळे मग्न आहेत. चला, याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे, ते जाणून घेऊया.
देवींच्या मूर्ती पाहिल्यानंतर लक्षात येते की त्या आपल्यासारख्याच आहेत म्हणजे हात, पाय, कान, नाक, मुख आहेत. पण त्या पूजनीय आहेत. पूजा कशाने होते? श्रेष्ठ कर्मांमुळे, पवित्रता धारण केल्यामुळे! या नऊ देवींनी कोणते श्रेष्ठ कर्म केले? श्रेष्ठ कर्माचे ज्ञान देणारा कोण? कधी केले हे श्रेष्ठ कर्म? तो काळ कोणता आणि कोण आहे ते कर्म सांगणारे, ज्यामुळे आपले श्रेष्ठ भाग्य बनते किंवा पूजा करण्यायोग्य होतो?
एक सद्गुरु व्यतिरिक्त सत्य मार्ग दाखवणारा कोणी नाही. श्रीमद भगवदगीतेच्या अध्याय ४/७ मध्ये "यदा यदा ही धर्मस्य ग्लार्निर भवती भारत..." असे म्हटले आहे. धर्माची ग्लानी होते तेव्हा मी येईन, या वचनानुसार, ईश्वर जेव्हा या सृष्टीवर साकार रूपाने येतात, तेव्हा बाप, शिक्षक, सद्गुरु म्हणून साकार भूमिका बजावतात. अध्यात्मिक विद्यालयात अध्यात्मिक शिक्षण देतात आणि कर्माची गुह्य गती समजावून सांगतात. ते कलह आणि क्लेशाने भरलेल्या जुन्या जगाचा विनाश करतात आणि सत्ययुगातील नवीन जगाची स्थापना करतात. त्यांच्या या कार्यात जो जितका सहकारी बनतो, तो तितकाच पूजनीय बनतो.
भगवद गीता श्लोक तीसरा अध्याय (कर्मयोग) ९वां मधील श्लोक
"यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः। तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ।
(भगवद गीता, अध्याय ३, श्लोक ९)
इस श्लोक में भगवान श्रीकृष्ण अर्जुन को समझाते हैं कि यज्ञ (उद्देश्यपूर्ण कार्य) के अलावा अन्य कर्म बंधन का कारण बनते हैं। इसलिए, हे कौन्तेय, आसक्ति से मुक्त होकर यज्ञ के उद्देश्य से कर्म करो।
ईश्वराने सांगितले आहे:
नवरात्रीचा अर्थ:
रात्री म्हणजे अंधकार. नऊ प्रकारच्या रात्री. नऊ धर्म आहेत. जेव्हा नऊ धर्म तमोप्रधान होतात, तेव्हा ते त्यांच्या पद्धतीने अंधकार पसरवतात. कोणता अंधकार? सत्य तर एकच असतो, पण अनेक लोक स्वतःला भगवान मानून बसतात. त्या नऊ धर्मांचे प्रमुख आहेत. म्हणून नवरात्री गाणे गाण्यात आले आहे.
नवरात्रात विशेषत: देवतांची पूजा होते. त्या देवता सधवा आहेत, त्यांचा पती कोण? 'जय माता दी' तर म्हणतात, पण पिताजीला विसरून जातात. ज्याने त्यांना पूजनीय बनवले.
मूर्तींचा आध्यात्मिक अर्थ:
नऊ का? कारण ईश्वर जेव्हा साकार रूपात सृष्टीवर येतात, तेव्हा ते जुन्या जगाचा विनाश आणि सत्ययुगाच्या नवीन जगाची स्थापना करतात. त्यांच्या या कार्यात नऊ आत्मा तन, मन, धन, वेळ, संपर्क आणि संकल्प यांच्याद्वारे सहकारी बनतात. त्यांच्या या आठवणींमुळे नऊ देवता पूजनीय झाल्या.
कन्या का? आणि ९ वर्षांचीच का? कारण ईश्वर जेव्हा या सृष्टीवर जुन्या जगाचा विनाश करतात, तेव्हा नऊ वर्षांची एक कन्या प्रथम समर्पित होते आणि तिच्या मागे आठ कन्या समर्पित होऊन सहकारी बनतात. पवित्रता धारण करतात, त्यामुळे साधू-संत देखील त्या कन्यांच्या पायावर पडतात, कारण पवित्रतेची पूजा होते.
आठ हात - तलवार: 🗡️
आठ हात म्हणजे "अष्टभुजा." त्या भुजांमध्ये शस्त्रास्त्र दाखवले जातात. तलवार! काय, तलवारीने असुरांचा गळा कापला असेल का? असुरांनाही मारण्याचे अधिकार नसतात. तलवार हे ज्ञानाचे प्रतीक आहे, ज्यामुळे ज्ञानामुऴे विकार रूपी असुरांवर विजय मिळवला जातो.
धनुष्यबाण:🏹
परिस्थितींमध्ये ज्ञानाच्या जोरावर विजय मिळवतो, धनुष्यबाण त्याचे प्रतीक आहे.
चक्र:🍥
सृष्टीचा सगळा चक्र त्याच्या बुद्धीमध्ये असतो, म्हणून सुदर्शन चक्र दाखवले आहे.
शंख:🐚
शंख म्हणजे ज्ञानाचा प्रसार. ईश्वर आल्यावर शंख ध्वनी करून सत्य ज्ञानाचे प्रकट करतात.
कमल-पुष्प:🪷
कमलाचे फूल म्हणजे पवित्रतेचे प्रतीक, चिखलात राहूनही पवित्र राहाणे.
गदा:
सृष्टीत जे काही होते, त्यात कल्याणच आहे, हे ज्ञान बुद्धीमध्ये असते, म्हणून गदा दाखवतात.
सिंहवाहिनी:
सिंहावर बसलेली देवी निडरतेचे प्रतीक आहे.
अखंडदिपक:🪔
अखंड दीपक म्हणजे आत्मिक स्मृतीचा दीपक प्रज्वलित होणे.
उपवास:
उपवास म्हणजे 'वरच्या' सोबत राहणे, वरचा म्हणजे ईश्वर, जो कर्मांपासून अलिप्त राहून सर्वकाही करतो.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment