नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा कालरात्री
नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा कालरात्री
*कार्ला डोंगरावरील*
*एकविरा आईच्या मंदिरातून*
*आजची नवदुर्गा..'कालरात्री'*
*आजचा रंग 🧡*
*भुजेवामयुग्मे शिरोऽसिं दधाना*
*वरं दक्षयुग्मेऽभयं वै तथैव ।*
*सुमध्याऽपि तुङ्गस्तनाभारनम्रा*
*लसद्रक्तसृक्कद्वया सुस्मितास्या ॥*
जिच्या दोन्ही डाव्या हातात नरमुन्ड आणि खडग आहेत तर दोन्ही उजव्या हातात माळ आणि अभय मुद्रा आहे.
आजची नवदुर्गा कालरात्रि. शत्रू जसा वागेल तसेच त्याच्याशी वागावे. बघूनच धडकी भरावी असे रुप धारण करावे. पण सज्जन शक्तीला अभय दयावे हे सांगणारे हे कालरात्री नवदुर्गेचे रूप.
दानवी शक्ती प्रबळ होत विध्वंस करतात तेव्हा आपले स्वरुप शस्त्र अस्त्र संपन्न होता प्रत्युत्तर देताना अवतार भीतीदायक असावा हे सांगणारा हा कालरात्रि देवीचा अवतार.
शुंभ.. निशुंभ राक्षसांना यमसदनास पाठविणारी ही देवी. अंधारासारखा काळाकुट्ट रंग.. श्वासोश्वासातून निघणाऱ्या अग्नीज्वाळा.. गळ्यात वीजेसारख्या चमकदार माळा. तिचे रक्ताळलेले डोळे, डोक्यावर विखुरलेले आणि लांब केस आहेत. खड्ग.. ब्रह्मांडस्वरुप त्रिनेत्रातून बाहेर पडणारी किरणे असे रौद्ररुप बघून भलेभले राक्षस पळून जातात.
नकारात्मक भावनेचा अंत करणारी ही देवी. आज हिच्या भक्तीत साधक मन सहस्त्रार चक्र स्थीत राहते. ब्रह्मांडातील समस्त सिद्धी प्राप्तीसाठी दरवाजे उघडतात. संमोहनशक्तीही प्राप्त होते. मनुष्याला त्रास देणाऱ्या ज्ञात अज्ञात दानवी शक्तीचा.. शत्रूचा अंत करणारी ही उग्र देवी. ही देवी भक्तांसाठी मात्र 'शुभंकारी' आहे. आरोग्य प्रदानकारी शत्रूभय संपवणारी, नकारात्मक विचार करणाऱ्यांचा अंत करणारी.. सिद्धी प्राप्त करुन देणारी आहे. आज हिचे षोडषोपचार पूजन करुन गुळ.. गुळाच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात.
प्रत्येकाला देवी वेगवेगळ्या स्थळी वेगवेगळ्या रुपात भेटते. असेच एक देवीचे स्थान म्हणजे मावळातील लोणावळा जवळील कार्ला डोंगरावरील एकविरा आई. ही भवसागरात अनेक कल्पित अकल्पित संकटे पार करुन संसार नौका सुरक्षित ठेवणारी ही देवी आहे. अशी तिला भक्त मान्यता. नित्य सागर लाटांचा सामना करणाऱ्या कोळी बांधवांची तसेच कायस्थ आणि घाट माथ्यावरील मराठ्यांची कुलदेवता.
आई म्हणजे जगतानाचा सर्वात मोठा आधार. एकमेव असे स्थान जिथे अंतःकरणातील सारे भाव मुक्तपणे व्यक्त करता येतात. कुठलाही मार्ग खुंटला की सदैव आठवते ती आईच. देवी ही तर आजन्म साथ देणारी जगन्माता.
या जगन्मातेजवळ जातांना सगळा 'अहंभाव' दूर केलाय. जी काही प्रतिष्ठा.. सत्ता.. संपत्ती प्राप्त झालीय ही आईचीच कृपा अशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. माझा अहंकार नष्ट होताच मनातील भितीचे.. भेदभावाचे मळभ दूर सरले. देवीच्या दिव्य दर्शनाने तर प्रगतीची प्रकाशवाट स्पष्ट दिसलीय. माझ्या जीवनात हे सारे शुभ मंगल घडल्याने अतिशय सुखावून मी आईचा "उदो उदो" करत 'गोंधळ' मांडलाय.
माझ्या या 'गोंधळात' गणरायासह सर्व देवांना मी आमंत्रण देतोय, हे देवदेवतांनो माझ्यावर कृपा करणाऱ्या आईच्या गोंधळाला आपण सारे या..
*लख्ख पडला प्रकाश*
*दिवट्या मशालीचा*
*गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा*
*मी पणाचा दिमाख तुटला*
*अंतरंगी आवाज उठला*
*ऐरणीचा सवाल सुटला*
*या कहाणीचा..*
*इज तळपली, आग उसळली*
*ज्योत झळकली, आई गं…*
*या दिठीची काजळ काळी*
*रात सरली आई गं…*
*बंध विणला, भेद शिनला*
*भाव भिनला आई गं…*
*भर दुखांची आस जीवाला*
*रोज छळते आई गं…*
*माळ कवड्यांची घातली गं..*
*आग डोळ्यात दाटली गं..*
*कुंकवाचा भरून मळवट*
*या कपाळीला…*
*आई राजा उधं उधं उधं..*
*उधं..उधं..उधं..उधं..*
*तुळजापूर तुळजाभवानी*
*आईचा..उधं..उधं..*
*माहुरी गडी रेणुका देवीचा..*
*उधं..उधं..*
*आई अंबाबाईचा उधं..उधं..*
*देवी सप्तशृंगीचा उधं..उधं..*
*बा सकलकला अधिपती*
*गणपती धाव*
*गोंधळाला याव..*
*पंढरपूर वासिनी विठाई धाव*
*गोंधळाला यावं*
*गाज भजनाची येऊ दे गं*
*झांज सुजनाची वाजु दे*
पत्थरातून फुटलं टाहो या प्रपाताचा
*एकविरा आई तू डोंगरावरी*
*नजर हाय तुझी कोल्यांवरी ..*
*‼या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रुपेण संस्थिता ‼*
*‼नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः.* ‼
२८.०९.२०२५
संकलन -अभय बक्षी नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment