नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा महागौरी

  नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा महागौरी 

   अंबाजोगाईच्या

          योगेश्वरी मंदिरातून                      आजची नवदुर्गा..'महागौरी'

           आजचा रंग 🦚

    *पद्मप्रिये पद्मिनि पद्महस्ते*

    *पद्मालये पद्मदलायताक्षि ।*

    *विश्व (विष्णु) प्रिये*

    *विष्णुमनोऽनुकूले* 

    *त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व ॥*

       *या हिरण्यवरणीं महालक्ष्मीचे रूप मन मोहक सुंदर आहे. या देवीला कमळे आवडतात, हिच्या हातात कमळ आहे, कमळ हेच तिचे घर आहे. कमळाच्या पाकळीप्रमाणे देवीचे डोळे आहेत, ही सर्व विश्वाला (विष्णूला) प्रिय आहे. ही श्रीविष्णूंच्या मनाला अनुकूल आहे. हे श्रीलक्ष्मी तू तुझे चरणकमल मजजवळ ठेव.*

        *नवरात्रात भक्तांना ज्या दिवसाची वर्षभर प्रतिक्षा असते तो दिवस. आज संध्याकाळी अष्टमी तिथी सुरू होणार. आज महागौरी पूजन होणार आणि उद्या उपवासाची अष्टमी आहे.*

        *अंबाजोगाई, जि. बीड येथे विराजमान आहे योगेश्वरी देवी. ही देवी कोकणी विशेषतः देशभरातील कोकणस्थ लोकांची कुलदेवी आहे. अंबाजोगाई देवीच्या दर्शनास फार मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथे अतिशय पुरातन असे हेमाडपंथी शैलीचे मंदिर आहे.*

        *देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप. दांतसूर नावच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माजवला होता. त्याचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि दांतसूरचा वध केला म्हणून ही देवी दांतसूरमर्दिनी झाली.*

        *आज नवदुर्गेचे महागौरी रुपात पूजन होणार. अत्यावश्यक गौर वर्णाची ही पार्वती माता. आज सप्तशती जप.. श्रीसुक्त वाचन.. होणार. आज कोकणस्थ मंडळी तांदूळाच्या पिठाचा देवीचा मुखवटा करून उभ्या महागौरीचे पूजन करणार. तिच्यासमोर रात्री घागरी फुंकणार. या घागर उदाच्या धूपाने भरून घेत ती घागर पाच वेळा फुंकली जाते. यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानले जाते. आज अनेक भक्त निर्जला व्रत करतात, तर आज कुमारीका.. कन्या पूजनही होते.*

        *देवीच्या महालक्ष्मी.. महाकाली आणि महासरस्वती या तीनही रुपांची कृपा हवी. जगात कलहाचा प्रारंभ होतो तो वाणीने. जगात सदैव शुभंकर शब्दाचाच आदर होतो. अशी वाणी लाभली होती ती फक्त ऋषी, मुनी.. तपस्वीं संताना. त्यांच्या वाणी सामर्थ्याने जगत कल्याणार्थ चमत्कार घडले. सरस्वती कृपेने मनुष्य ज्ञानी.. विद्यावान.. विवेकी होत देवता होवू शकतो हे पण सिद्ध झालेय.*

        *नवरात्रात देवीच्या आराधनेत आकंठ बुडालेले भक्त देवीकडून शक्तीचे दान प्राप्त करतात. पण या शक्तीला साथ हवी ती विद्येची. विद्याप्राप्तीनेच चांगली वाणी प्राप्त होते.. प्रगती होते. सरस्वती ही विद्या देणारी देवी.*

        *स्नेहसंबंधाचे मुळ आहे ते मधूर वाणीमध्ये. हे शब्ददान प्राप्त होते ते सरस्वती देवीच्या कृपेने. ज्याची वाणी गोड तोच जग जिंकतो. सारे कलह संपवायला या सरस्वतीलाच शरण जावे. देवीच्या सर्वांगसुंदर रुपाचे वर्णन करावे तेवढे कमीच. हे सुंदर हसरे मुखकमल बघताच मन प्रसन्न होते. जगण्यासाठी उर्जा मिळते. हिच्या कृपेच्या शीतल चांदण्याने जीवनच उजळते.*

        *विणेवर देवीची नुसती बोटे जरी फिरली तरी दशदिशात आनंदी संगीत जन्मते. हे संगीत कल्पवृक्षाप्रमाणे सर्व इच्छा आकांशाची पुर्ती करते. हे शारदे.. तुझी नित्य कृपा आम्हांवर राहो. विद्याप्राप्ती होत राहो. विद्येने हे जीवन उजळो. तर मागू या सरस्वतीला शब्दांचे वरदान.*

        *मनुष्य आजारी पडला की विविध प्रकारे औषधोपचार केले जातात. तसेच परमेश्वराच्या भक्तीत अडसर आहे तो अहंकाराचा. मग या अहंकार मुक्ततेचा एक उपाय म्हणजे जोगवा मागणे. नवरात्रात भक्त मंगळवार.. शुक्रवारी अनोळखी पाच घरी भिक्षा मागून मिळणाऱ्या कोरड्या भिक्षेवर जगतात. अनोळखी लोकांकडे भिक्षा मागताना जगाचे जे अनुभव येतात तेव्हा भक्तांचा सगळा अहंकार गळून पडतो.*

        *देवीचे रुप हे आदि अनादि निर्गुण निराकार असले तरीही ती भक्तांसाठी सगुणरुपात प्रकटते. देवीने जसा महिषासूर दैत्याचा वध केला, त्याप्रमाणे मोहातून निर्माण होणाऱ्या मानवी मनातील असुरीवृत्तीचाही ती अंत करते.*

        *भक्तीत अडसर असतो तो मनात उदभवणाऱ्या विकल्पाचा. भौतिक जगातील घटना असे होईल का.. तसे होईल का अशा विचारांनी चिंतेत भर टाकतात, म्हणूनच देवीला अनन्यभाव शरण जायला हवे. नवरात्रात नवविध भक्तीने देवीकडून सत्य ज्ञान प्राप्तीचे वरदान मिळते. अहंकार मुक्त होता येते. पूर्ण बोध प्राप्त झाला की संसारात कशाचाही मोह उरत नाही. मग हे मन निस्संग.. पवित्र होत मनात विकल्प येत नाहीत. षड्रिपूंवर विजय प्राप्त होण्याचा मार्ग सापडतो. देवीचे श्रद्धेने पूजन करता येते.*

        *मग अशा ज्ञान प्राप्तीने देवीचे पूजन केले की मोक्ष लाभ होतो. या मोक्षासाठीच ही सारी जीवाची धडपड. त्यामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. नवरात्रात घरोघरी रोज भक्तीपूर्वक जोगवा गायला जातो.*

  

  *जय शारदे वागीश्वरी*

  *विधिकन्यके विद्याधरी*


  *ज्योत्स्नेपरि कांती तुझी,*

  *मुखरम्य शारद चंद्रमा*

  *उजळे तुझ्या हास्यातुनी,*

  *चारी युगांची पौर्णिमा*

  *तुझिया कृपेचे चांदणे*

  *नित वर्षू दे अमुच्या शिरी*

  *वीणेवरी फिरता तुझी चतुरा*

  *कलावय अंगुली*

  *संगीत जन्मा ये नवे,*

  *जडता मतीची भंगली*

  *उन्मेष कल्पतरुवरी,*

  *बहरून आल्या मंजिरी*


  *आईचा जोगवा जोगवा मागेन*

  *अनादी निर्गुणी प्रगटली भवानी*

  *मोह महिषासूर मर्दनालागूनी*

  *विविध तपाची करावयाची झाडणी*

  *भक्तालागी तू पावसी निर्वाणी*

        *देवी सर्वभू‍तेषु माँ गौरी रूपेण संस्थिता ।*

        *नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥*

        *सर्वत्र विराजमान हे गौरी रुपातील माते तुला माझा वारंवार नमस्कार.*

                *२९.०९.२०२५*

संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344.               ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.