नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा स्कंद माता.

नवरात्रोत्सव:-आजची नवदुर्गा स्कंद माता.




 


स्कंदमाता देवीचा मंत्र

सिंहासना गता नित्यं पद्माश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।।
या देवी सर्वभू‍तेषु मां स्कंदमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

चंद्रपूरच्या महाकाली मंदिरातून  आज ललिता पंचमी

कुमारिका पूजनाची

आजचा रंग हिरवा 💚

आजची नवदुर्गा..स्कंदमाता

  नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम् ।

        भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम् ॥

        कमळावर अधिष्टित, निळे रेशमी वस्त्र परिधान करणाऱ्या, सुवर्णकांतीच्या, भक्तांना नित्य वर देणाऱ्या अशा ललितादेवीचे मी चिंतन.. पूजन करतो.

        आदिशक्तीवर भक्तांची नितांत श्रद्धा आहे. जीवनात अनेकदा संकट येतात.. परिक्षा होते पण तीच तारते हा भक्तांना विश्वास आहे. याचेच प्रत्यंतर नवरात्रात येतेय.

        भल्या पहाटे देवीच्या मंदिरात काकडा आरतीसाठी जाणाऱ्या भक्तांची रस्त्यावर गर्दी आहे. मंदिरात दर्शनासाठी रांगा आहेत. सर्वांची मन प्रफुल्लीत आहेत. महिला वर्ग तर नित्य विशिष्ट रंगाची वस्त्र परिधान करुन.. गजरे माळून.. अलंकार घालून देवीची ओटी भरण्यास येत आहेत. स्वयंस्फूर्त  एकत्रिकरणाचे हे दृश्य.. सुखी समाधानी संतुष्ट संपन्न.. सुहास्यवदनी महिलांचे दर्शन हे संस्कृतीचे वैभवच. मातृशक्ती मंदिरात.. घरी आराधनेत दंग आहे.

        नवरात्रात आज महत्त्वाचा असा ललितापंचमीचा उपांग व्रताचा दिवस.

        एकैकां पूजयेन्नित्यमेकवृद्ध्या तथा पुनः ।

        द्विगुणं त्रिगुणं वापि प्रत्येकनवकं च वा ॥

        अर्थात नवरात्रात तुम्ही जेवढ्या जास्तीतजास्त कुमारींचे पूजन देवी समजून कराल, तेवढे जास्त पुण्य तुम्हांला प्राप्त होईल.

        समाजातील जास्तीतजास्त कुमारिकांचे पूजन व्हावे या उद्देशाने जास्त कुमारिका पूजनाचे जास्त पुण्य फळ सांगितलेय. या भावनेमुळे समाजात लहान मुलींकडे पुण्यभावाने बघितले जाते, यामुळे गरजू बालिकांना मदतही होते.

        भारतीय संस्कृतीत स्त्री सन्मानाचा प्रारंभ त्यांच्या बालवयापासून व्हावा म्हणून धर्मभावनेची ही जोड दिलेली आहे.

        चंद्रपूरचे कालीमाता मंदिर. देशात एकात्मतेचे दर्शन घडविणारे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे हे कालीमातेचे मंदिर. या चंद्रपूरच्या देवीच्या दर्शनाला मराठवाडा.. तेलंगणा.. छत्तीसगड.. म.प्र. येथून नवरात्रात भक्त येतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी भक्त असतात.

        देवीच्या तीन स्वरुपापैकी एक म्हणजे महाकाली. चंद्रपूरला महाकाली विराजमान आहे. अत्यंत पुरातन असे हे मंदिर. याचा उल्लेख स्कंद पुराणातही आहे. वाकाटक कालीन गोंड साम्राज्याने गुंफेत बांधलेले हे मंदिर. एका हातात खड्ग तर दुसऱ्या हाती ढाल घेतलेली ५ फुट उंचीची इथे पुरातन मूर्ती आहे. खांडक्या बल्लाळशहा राजाला दृष्टांत झाल्याप्रमाणे त्याने हे जंगलातील गुंफेत मंदिर शोधले. इथे अजंठा वेरुळप्रमाणे शिल्पकलेची काही शिल्प चित्रही आहेत.

        या बल्लाळशहा राजाचा लढाईत पराभव होत असताना एका सैनिकाने "जय महाकाली" उदघोष करताच सैन्यात एवढे चैतन्य निर्माण झाले की राजाने हे युद्ध जिंकले. गोंड राजाचे साम्राज्य तब्बल साडे पाचशे वर्षे होते. गोंड राणी हिराई यांनी या परिसरात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रमाणेच अनेक धर्मस्थळांचा दानधर्म करुन विकास केलाय.

        आज नवदुर्गेतील स्कंदमाता रुपाची उपासना.. पूजन होणार. सूर्य मंडळाची अधिष्टाती ही देवी. पहाडावर राहून मोक्षमार्गाचे द्वार उघडून देणारी.. भक्तांना अलौकिक तेज देणारी.. समस्त इच्छाची पूर्ती करणारी, मन एकाग्रता करुन देणारी.. हा भवसागर पार करुन देणारी.. अडाणी मनुष्यालाही विद्वान करणारी.. नवचेतना निर्माण करणारी ही स्कंदमाता. कवी कालिदासावर याच मातेची कृपा होती.

        स्कंद म्हणजे कार्तिकेय. शिवपार्वती पुत्र. जो श्री गणेशाचा भाऊ आहे. या देवीला चार भुजा आहेत. ही शुभ्र वर्णाची आहे. हिच्या एका हातात बाळ स्कन्दला धरले आहे. इतर तीन भुजात कमळ पुष्प, वरदमुद्रा आहे.

        सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया ।

        शुभदाऽस्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ॥

        वाल्याचाही उद्धार करुन थोर ऋषी करण्याचे सामर्थ्य असलेल्या या मातेला आपणही शरण जात पूजन करुया.

मी शरण तुला जय अंबे माँ

  अंबे माँ, जगदंबे माँ

चरणी तुझ्या सुखशांती मिळे

पाप वासना दूर पळे

  तू दुर्गा तू काली माँ

  तू लक्ष्मी, संतोषी माँ

  महिषासुर मर्दिनी देवी पार्वती माँ

 *तुझ्या कृपेचे नवलाई*

  *वाल्याचा वाल्मिकी होई*

  *शक्तीदेवी तू महान*

  *दूर करी अमुचे अज्ञान*

  *मायभवानी भक्तांना तू दे वरदान*


 *त्यागामधुनी पुण्य मिळे*

  *सत्कर्मांची गोड फळे*

  *एकवीरा, तू सत्यवती*

  *तूच शारदा, सरस्वती*

  *आदिमाते दे आम्हाला शुद्धमती*

‼या देवी सर्वभूतेषु भ्रांन्तिरूपेण संस्थिता‼

       ‼नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः‼

२६.०९.२०२५

संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.