अखेर मान्सून बरसला आणि.... बळीराजा सुखावला.
अखेर मान्सून बरसला आणि... बळीराजा सुखावला.
दीपक देशपांडे
२५मे रोहीणी नक्षत्र लागले ,पावसाची आणि पावसाळ्याची जाणीव झाली मात्र पाऊस आलाच नाही
,७ जून मृग नक्षत्र लागले, पावसाची आतुरतेने वाट बघत आमचा बळीराजा कामाला लागला, शेतीच्या मशागतीसाठी प्रयत्न सुरू झाले ,१५जून उलटूनही पावसाने दडी मारलेली , दरवर्षीप्रमाणे यंदाही हवामान खात्याच्या मोसम विभागाचे अंदाज खोटे ठरवीत पावसाने दडी मारली आणि सूर्यदेव आग ओकू लागले, त्यामुळे आमच्या बळीराजाच्या डोळ्यासमोर दिवसाही काजवे चमकू लागले होते.
ही तर पावसाची सुरुवात आहे ,मात्र आमच्या बळीराजाच्या स्वप्नांची ती एक आशा आहे , उद्याच्या भविष्याची ती एक सुंदर किनार आहे, स्वप्न पुर्ण करण्यासाठी बाळगायच्या आशेचा तो एक किरण आहे, उद्याच्या दुनीयेतील आपल्या अस्तित्वाची ती जाण आहे.
आणि म्हणूनच आमचा बळीराजा आणि समस्त नागरिक या पहिल्या पावसाचे मनापासून मन भरेस्तोवर स्वागत करीत आहेत आणि अशाच सुखद अनुभवांची कामना करीत आहेत. एका आनंददायी पर्वाची ही तर फक्त सुरुवात आहे ,या प्रवासात किती खाच खळगे पार करुन हा प्रवास पूर्ण होणार हे तर विधात्याने आपल्या अधिकारांत राखून ठेवले आहे , म्हणून आजच्या दिवसाचा हा आनंदसोहळा उघड्या डोळ्यांनी अनुभवताना केवळ आनंदी आनंद गडे म्हणत हा आनंदोत्सव साजरा करुया.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments
Post a Comment